IMPIMP

Pune Crime | पिंपरी-चिंचवडच्या ‘सासु’ विभागाकडून 1 लाखाचा गुटखा जप्त; एकाला अटक अन् पुण्याच्या रास्ता पेठेतील बडा डिलर मिथुन नवलेविरूध्द गुन्हा दाखल

by nagesh
Pimpri Chinchwad Police | Gutka worth Rs 1 crore seized from Tempo near Chakan pimpri chinchwad police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची (Gutkha) अवैधरित्या साठवणूक करणाऱ्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने (Pimpri Chinchwad Police Social Security Cell) कारवाई (Pune Crime) केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकाला अटक (Arrest) करण्यात आली असून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.23) सायंकाळी चारच्या सुमारास काळेवाडी (Kalewadi) येथील पाचपीर चौकात करण्यात आली आहे. तर पुण्यातील एका बड्या डिलरवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

महेश परमानंद भोजवानी Mahesh Parmanand Bhojwani (वय-53 रा. पंचनाथ कॉलनी, बी पाचपीर चौक, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिथुन प्रतापसिंह नवले Mithun Pratap Singh Navale (वय-40 रा. डुल्या मारुती चौक, रास्ता पेठ, पुणे) याच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस नाईक वैष्णवी विजय गावडे Vaishnavi Vijay Gawde (वय-34) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला मिथुन नवले हा गुटखा व्यवसायातील बडा डिलर आहे.

 

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Police Inspector Devendra Chavan) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला काळेवाडी येथील महेश भोजवानी याने राहत्या घरामध्ये प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केली आहे.
तसेच त्याची विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळेवाडी येथील महेश भोजवानी याच्या घरावर छापा टाकून
1 लाख 3 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन भोजवानी याला अटक केली.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने हा मुद्देमाल मिथुन नवले याच्याकडून घेतल्याची माहिती दिली.
पोलिसांनी नवले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नवले हा पुण्यातील मुख्य डिलर असून तो सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pune Crime | 1 lakh gutka seized from Pimpri-Chinchwad police Social Security Cell; One arrested and a case filed against Mithun Navale, a big gutka dealer in Rasta Peth, Pune

 

हे देखील वाचा :

MPSC Recruitments | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये 900 पदांवर मेगा भरती, 11 जानेवारीपर्यंत करू शकता अर्ज

Christmas Festival 2021 | ख्रिसमससाठी राज्य सरकारची नियमावली जारी; जाणून घ्या नवीन नियम

Chitra Wagh | ‘शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदारावर दाखल करावा’

 

Related Posts