IMPIMP

Pune Crime | पुण्यात 400 गुंतवणूकदारांची 16 कोटींची फसवणूक ! महेश लोहिया, सुनील सोमाणी, गजानन मानेनंतर चार्टर्ड अकाऊंटंट (CA) कैलास मुंदडाला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
pune-crime-srpf-exam-in-pune-attempt-to-copy-by-blue-tooth-arrested-by-hadapsar-police

पुणे न्यूज (Pune News):  सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime  गुंतवणूकदारांची 16 कोटी 16 लाख 95 हजार 470 रुपयांची फसवणूक (Pune Crime) केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लेखा परीक्षकाला (सी.ए.) अटक केली. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने 400 हुन अधिक ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कैलास राधाकिसन मुंदडा Kailash Radhakisan Mundada (42, रा. रोहन कृतिका, आय/601, सिंहगड रोड, राजाराम पूलाजवळ, पुणे) असे अटक केलेल्या सीएचे (chartered accountant) नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी मुख्य आरोपी महेशकुमार भगवानदास लोहिया Maheshkumar Bhagwandas Lohia (31, रा. शिवसागर रेसिडेन्सी, फ्लॅट नं. ई 1/103, सनसिटी रोड, सारस्वत बँकेजवळ, आनंदनगर, सिंहगड रोड), सुनिल पुरूषोत्तम सोमानी Sunil Purushottam Somani (54, रा. सी 314, रविराज हेरिटेज, भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे), गजानन महादेव माने Gajanan Mahadev Mane (30, रा. त्रिवेणी बिल्डींग, पंचवटी नगर, परळी वैजनाथ, जि. बीड) या तिघांना अटक करण्यात आली होती.

 

 

याबाबत 51 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी महेशकुमार लोहिया आणि सुनिल सोमानी यांना पोलिसांनी दि. 25 सप्टेंबर 2019 मध्ये अटक केली होती तर आरोपी गजानन मानेला पोलिसांनी 3 ऑक्टोबर 2019 मध्ये अटक केली होती. सध्या आरोपी महेशकुमार लोहिया हा न्यायालयीन कोठडीत म्हणजेच जेलमध्ये आहे. आरोपी सुनिल सोमानी आणि गजानन माने हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. हा गुन्हा नोव्हेंबर 2016 ते सप्टेंबर 2019 दरम्यान शुक्रवार पेठेतील शिवकन्या अ‍ॅन्ड शिवकन्या इन्व्हेस्टमेंट (1360, भारत भवन, ऑफिस नं. बी-307) येथे घडला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

फिर्यादी यांनी लॉगटर्म गुंतवणुकीसाठी दिलेला 10 लाख रुपयांचा धनादेश महेशकुमार लोहिया maheshkumar lohia याने त्याच्या बॅंक खात्यात जमा केला. फिर्यादींना खात्याची खोटी माहिती सांगून बनावट नफा-तोटा पत्रके तयार करून ती ई-मेलद्वारे पाठवून, खोटे संदेश पाठवून दिशाभूल केली. या प्रकरणात 400 हुन अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुंदडा याला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. गुंतवणूकदारांना फायदा होण्याचे आमिष दाखवून त्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. मुख्य आरोपीकडून त्याने 1 कोटी 10 लाख 62 हजार 444 रुपये स्वीकारल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये निष्पन्न झाले आहे. मुंदडा व्यवसायाने सी. ए असून, गुन्ह्यातील काही गुंतवणूकदार त्याचे क्‍लाईंट आहेत.

 

 

महेशकुमार लोहिया maheshkumar lohia याने गुंतवणुकदारांना दिलेले खोटे शेअर्स ट्रेडिंगचे स्टेटमेंट दिले.
गुंतवणूकदारांना संशय येऊ नये, यासाठी त्या स्टेटमेंटवरील फायद्यानुसार आयकर भरण्यास भाग पाडले आहे.
याचा अधिक तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील मारुती वाडेकर (Government Advocate Maruti Wadekar) यांनी केली.
मुंदडा याला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस.एस.गोसावी (Special Judge S.S. Gosavi) यांनी दिला आहे.

 

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta),
आर्थिक व गुन्हे शाखेच्या (economic offences wing pune) पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके (deputy commissioner of police bhagyashree navtake) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद नलवडे (Assistant Police Inspector Pramod Nalwade)
या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | 16 crore fraud of 400 investors in Pune! Chartered Accountant(CA) Kailas Radhakisan Mundada arrested by economic offences wing after Mahesh Bhagwandas Lohia, Sunil Purushottam Somani, Gajanan mahadev Mane

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 216 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Modi Government | मोदी सरकारचा महत्वपुर्ण निर्णय ! महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 700 कोटींची मदत जाहीर

Crime News | वेब सिरीजच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओ शूट, अभिनेत्रीची पोलिसांत तक्रार

Pune Crime | मारहाण केल्याचा राग आल्याने सख्या भावाने केला भावाचा खून

 

Related Posts