IMPIMP

Pune Crime | तळेगाव दाभाडेमधील 17 वर्षीय युवकाची हत्या गोळी झाडून नाही तर…

by nagesh
Nanded Firing Case | nanded firing case woman congress worker firing in nanded three people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे युवकाची हत्या (Murder in Pune) झाल्याची घटना (Pune Crime) गुरुवारी (23 डिसेंबर) रोजी मध्यरात्री घडली. ही हत्या गोळी झाडून झाल्याची माहिती प्रथम समोर आली. मात्र, इंस्टाग्रामच्या स्टेट्समुळे लोखंडी हातोडीने ही हत्या केल्याची माहिती समोर आलीय. दशांत अनिल परदेशी (Dashant Anil Pardeshi) (वय 17, रा. तळेगाव दाभाडे) असं हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे सख्ख्या चुलत भावाने मित्राच्या मदतीने दशांतची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. लोखंडी हातोड्याने आधी डोक्याच्या मागून आणि मग डोळ्यावर प्रहार केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

याबाबत माहिती अशी, दशांतला फोटो व्हिडीओ काढून एडिटिंग करण्याचा आणि ते इन्स्टाग्रामवर शेअर करण्याची आवड होती. यासाठी त्याने खास महागडा फोनही खरेदी केला होता. त्यामुळे दोन्ही आरोपींनी फोटो काढून इन्स्टाग्रामवर शेअर करण्याचा बहाणा बनवला. त्यानुसार आरोपी प्रकाश लोहारने (Accused Prakash) दशांतला फोन करून बोलावलं. सायंकाळी 6 वाजता हे दोन्ही आरोपी त्याला भेटले आणि तिथून एका बंद कंपनी समोर पोहचले. दशांत त्याच्या महागड्या फोनवर या दोघांचे फोटो घेत होता, तेंव्हाच हातोडा काढून मागून एकाने डोक्यावर वार केला. त्यानंतर डोळ्यावर हल्ला केला. यामध्ये दशांतचा जागीच मृत्यू (Died) झाला. (pune Crime)

दरम्यान, दशांतच्या डोक्याच्या मागून आणि डोळ्यातुन रक्तस्राव होत असल्याने अज्ञातांनी बंदुकीची गोळी झाडून हत्या केल्याचं प्रथम समजलं.
त्याचबरोबर यावेळी दशांतचा सख्खा चुलत मोठा भाऊ कमलेश (Kamlesh Pardeshi) आणि मित्र प्रकाश ही तिथं उपस्थित होते.
आज सकाळीही पोलिसांसोबत ते घटनास्थळी आले होते. परंतु, पोलिसांनी (Talegaon Dabhade Police Station) जेव्हा तपासाला सुरुवात केली.
त्या तपासात अखेरचा काॅल प्रकाशने केल्याचं निदर्शनास आलं. यानंतर चौकशी केली असता दोघांनी हत्या केल्याची कबुली दिली.

 

Web Title :- Pune Crime | 17 year boy shoot dead in talegaon because instagram status

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | लाॅकडाऊनबाबत अजित पवारांची अधिवेशनादरम्यान महत्वाची माहिती; नियमाबाबत आमदारांचेही टोचलं कान

Blood Sugar Level | ‘ब्लड शुगर’च्या उपचारासाठी परिणामकारक ठरू शकते उंटीणीचे दूध, जाणून घ्या इतर फायदे

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 79 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts