IMPIMP

Pune Crime | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | कंपनीची परवानगी न घेता परस्पर जाहिरातीच्या होर्डिंगवर स्वत:च्या वाढदिवसाचे बॅनर लावणे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण (Former NCP corporator Haji Gafur Pathan) यांना महाग पडले आहे. या जाहिरातीच्या बिलाचे पैसे मागण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍याला त्यांनी शिवीगाळ करुन लाथा मारुन पाहून घेण्याची धमकी दिली.(Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी अतुल माधव संगमनेरकर (वय ५५, रा. रास्ता पेठ – Rasta Peth) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९३४/२२) दिली आहे. त्यावरुन हाजी गफुर पठाण Haji Gafur Pathan (वय ४५, रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मिठानगर (Mitha Nangar, Kondhwa) येथील अशोक म्युज सोसायटी (Ashoka Mews Society) मागील बाजुस टी जंक्शनजवळ शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅप्शन आऊटडोअर अ‍ॅडव्हरटायजिंग या कंपनीमध्ये नोकरीला आहेत.
कंपनीचे कोंढवा येथील जाहिरातीचे होर्डिंगवर हाजी गफुर पठाण यांनी आपल्या वाढदिवसाचे बॅनर कंपनीची परवानगी न घेतला लावले होते.
कंपनीचे त्याचे बिल फिर्यादीचे ऑफिसवर पाठविले होते. या बिलाचे रक्कमेसाठी फिर्यादी हे पठाण यांना भेटण्यासाठी गेले होते.
पठाण यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथ मारुन पाहून घेण्याची धमकी दिली.
त्यामुळे त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर (API Shilimkar) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | A case has been registered against former NCP corporator Haji Gafur Pathan, know the case

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला सल्ला

Pune Crime | तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी; पुण्यातील पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

Sachin Sawant | गुजरातच्या हितासाठी देशातील तीन सरकारे कार्यरत, मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, दुसरे गुजरात सरकार आणि तिसरे शिंदे-फडणवीस सरकार – सचिन सावंत

 

Related Posts