IMPIMP

Sachin Sawant | गुजरातच्या हितासाठी देशातील तीन सरकारे कार्यरत, मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, दुसरे गुजरात सरकार आणि तिसरे शिंदे-फडणवीस सरकार – सचिन सावंत

by nagesh
 Sachin Sawant | congress leader sachin sawant gave answer to industrial minister uday samant claim over tata airbus project

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन टाटा एअरबस (Tata Airbus Project) हा 22000 कोटी गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. तो आता गुजरातला हलविला आहे. शिंदे यांच्या कार्यकाळातील हा चौथा प्रकल्प गुजरातला चालला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मात्र यातून हात झटकले आहेत. हा प्रकल्प गुजरातला जाणार हे महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात ठरले होते, असा दावा उदय सामंत यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर काँग्रेस नेते (Congress Leader) सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाष्य केले आहे. टाटा एअरबसचा आणि भारत सरकारचा सामंजस्य करार झाला होता, पण तो गुजरात सरकारबरोबर नव्हता झाला, असे सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजप (BJP) नेत्यांची महाराष्ट्राचे नुकसान होत असताना, मोदी यांच्यापुढे ब्र काढण्याची हिंमत नाही. ते सांगतात की टाटा एअरबसचा मागील वर्षी सामंजस्य करार झाला होता. पण हा करार केंद्र सरकार (Central Government) आणि कंपनी यांच्यात झाला होता. गुजरात राज्य सरकारसोबत झाला नव्हता. त्यामुळे आता भाजपवाल्यांची दुसऱ्या राज्यात जाणारे प्रकल्प थोपवण्याची ताकद कुठे गेली?, असा प्रश्न सावंत यांनी विचारला.

 

टाटा एअरबससाठी केंद्र सरकारने गुजरातमधील ढोलेरा जागा दाखवली होती. पण, आता हा प्रकल्प बडोद्याला होत आहे.
यातून ढोलेरा अव्यवहार्य ठिकाण आहे. हे सिद्ध होते. तसेच गुजरातमध्येच सर्व प्रकल्प जावेत, ही मोदी सरकारची इच्छा आहे.
महाराष्ट्राचे जाणिवपूर्वक नुकसान केले जात आहे. गुजरातच्या हितासाठी देशातील तीन सरकारे कार्यरत आहेत.
मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, दुसरे गुजरात सरकार (Gujarat Government) आणि तिसरे शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government).
मागील काही काळात ज्या वेगाने गुजरातकडे महाराष्ट्रात होऊ घातलेले प्रकल्प चालले आहेत,
ते पाहता जितका काळ हे राहतील तितका महाराष्ट्र कंगाल होईल, असे सचिन सावंत म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sachin Sawant | congress leader sachin sawant gave answer to industrial minister uday samant claim over tata airbus project

 

हे देखील वाचा :

Aaditya Thackeray | ‘निवडणुकांना समोरे जायला घाबरतात, ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार?’ – आदित्य ठाकरे

Uddhav Thackeray | एअरबस प्रकल्प घालवल्यामुळे उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी – भाजप

Blood Sugar | ब्लड शुगर तपासताना कधीही करू नका या 5 चूका, जाणून घ्या कोणत्या

Abdul Sattar | कृषीमंत्री अब्दुल सत्तार काजू बदाम खात शेतकऱ्यांच्या नुकसानीची चर्चा करतात

 

Related Posts