IMPIMP

Pune Crime | नगरसेविकेला ब्लॅकमेल करुन मागितली २५ लाखांची खंडणी; आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | A corporator was blackmailed and demanded an extortion of 25 lakhs; Extortion case filed against RTI activist

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | तुम्ही बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) केले असून तुमचे नगरसेवकपद घालवितो.
आगामी निवडणुकीत तुमची सोशल मीडियावर (Social Media) बदनामी करतो, अशी धमकी देऊन नगरसेविकेच्या पतीकडे २५ लाख रुपयांची
खंडणी (Extortion) मागणार्‍या आरटीआय कार्यकर्त्यावर (RTI Activist) खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जितेंद्र अशोक भोसले Jitendra Ashok Bhosle (रा. विमाननगर) असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे.
जितेंद्र भोसले याच्यावर यापूर्वी खंडणीचे ३ व इतर ३ गुन्हे दाखल आहेत.

 

 

याप्रकरणी विमाननगर येथील एका ४५ वर्षाच्या नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३७/२२) दिली आहे. हा प्रकार ३० जुलै २०२० ते २५ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला.
(Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र भोसले हा माहिती अधिकारात माहिती काढून त्याद्वारे लोकांना
ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो.
फिर्यादी यांच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम केले असल्याबाबत त्याने पुणे महापालिका
(Pune Municipal Corporation) व पीएमआरडीए (PMRDA) येथे तक्रारी करुन नगरसेवक पद रद्द करण्याबाबत खोटे अर्ज केले होते.
त्याच्या अर्जाची चौकशी होऊन अशा प्रकारे कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा पीएमआरडीने दिला होता.
त्यानंतरही महापालिका निवडणुकीत तुमची व तुमच्या पत्नीची सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याची भीती दाखवून भोसले याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

 

२५ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेटून त्याने २५ लाख रुपये मागितले. त्याबाबत त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्यावर काही कारवाई झाली नाही.
त्यानंतर त्यांनी आता खंडणी विरोधी पथकाकडे (Anti Extortion Squad) तक्रार केली.
पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (PI Balaji Pandhare) यांनी त्यांच्या अर्जाची चौकशी करुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title:  Pune Crime | A corporator was blackmailed and demanded an extortion of 25 lakhs; Extortion case filed against RTI activist

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | आनंदननगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाची माहिती घेण्यात येईल – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Pune PMC News | सुविधा हव्यात तर जास्तीचा मिळकत कराची तयारी ठेवावी लागणार; प्राथमिक सर्वेक्षणात कॅपिटल टॅक्समधून दुप्पट उत्पन्न मिळण्याचा अंदाज

 

Related Posts