IMPIMP

Pune PMC News | आनंदननगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाची माहिती घेण्यात येईल – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

by nagesh
Pune PMC Budget | Budget of Pune Municipal Corporation on March 24; The budget is likely to be in excess of Rs 8500 crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC News | बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील (Gangadham Chowk, Bibvewadi) आनंदनगर (Anand Nagar, Pune) येथील झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन कोणी केले याची माहिती घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. गंगाधाम चौकातील आनंदनगर झोपडपट्टीतील काही कुटुंबियांचे हिलटॉप हिलस्लोपवर अनधिकृत इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यावरून स्थानीक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये मागील आठवड्यात वाद झाले होते. (Pune PMC News)

 

बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकालगत ‘सॉलीटेअर’ या बांधकाम कंपनीच्यावतीने शेकडो सदनिका असलेल्या गगनचुंबी इमारती उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीसमोरच मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे ४० वर्षे जुनी झोपडपट्टी हटविण्यात येणार आहे. विशेष असे की नवीन गृहसंकल्प आणि त्यामागे काम सुरू असलेल्या मोठ्या होलसेल मार्केटकडे जाण्यासाठी या झोपडपट्टीतूनच महापालिकेने कलम २०५ नुसार रस्ता आखला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ८० झोपड्या हलविण्यात येणार आहेत. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, येथील ८० झोपडपट्टी वासियांपैकी पुनर्वसन बिबवेवाडी येथेच हिलटॉप हिलस्लोपवरील दोन इमारतींमध्ये करण्यात आले आहे. या दोन्ही इमारती बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याने काही नागरिकांनी विरोध केला आहे. याला मागील आठवड्यामध्ये वेगळे वळण लागले.
पुनर्वसनाला विरोध केल्याने भाजपच्या स्थानीक लोकप्रतिनिधींनी आम्हाला शिवीगाळ
आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे ऑनलाईन तक्रारही केली आहे.
परंतू अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही.
यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता,
पुनर्वसनावरून वाद झाल्याची बाब आजच समजली आहे.
याप्रकरणी माहिती घेउन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

 

Web Title :- Pune PMC News | Information about slum rehabilitation in Anandananagar will be taken – Municipal Commissioner Vikram Kumar

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | सुविधा हव्यात तर जास्तीचा मिळकत कराची तयारी ठेवावी लागणार; प्राथमिक सर्वेक्षणात कॅपिटल टॅक्समधून दुप्पट उत्पन्न मिळण्याचा अंदाज

Gulabrao Patil | मंत्री गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना वादग्रस्त सल्ला; म्हणाले – ‘मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी पक्षाप्रमाणे इंग्रजी शाळांचे विद्यार्थी फोडा’

Ambadas Danve | ‘…हाच आमच्या शिवसेनेचा नैतिक विजय’, अमित शहांच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका

 

Related Posts