IMPIMP

Pune Crime | फ्लेक्सवर माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या शेजारी फोटो न लावल्याने लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | खराडी गावठाण (Kharadi Gaonthan) येथील नवरात्र उत्सवाच्या स्टेजवर माजी आमदार बापूसाहेब पठारे (Former MLA Bapusaheb Pathare) व त्यांच्या फोटोबरोबर आमचे फोटो का लावले नाही, असे म्हणून चौघांनी तरुणावर लोखंडी रॉड, काठ्याने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी कैलास दत्तात्रय पठारे (वय ४१, रा. खराडी गावठाण) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५०/२२) दिली आहे. त्यानुसार राजाराम विष्णु पठारे (वय ५२), बाळासाहेब विष्णु पठारे (वय ५८), स्वप्निल बाळासाहेब पठारे (वय २४) आणि सौरव राजाराम पठारे (वय २०, सर्व रा. मुंजाबा चौक, खराडी गावठाण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खराडी गावठाणात सोमवारी रात्री सव्वा आठ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास पठारे यांनी खराडी गावठाण येथे साजरा करीत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या स्टेजचा खर्च केलेला असून त्यावर त्यांनी फ्लेक्स लावला आहे.
या फ्लेक्सवर माजी आमदार बापूसाहेब पठारे, महेंद्र पठारे, त्यांच्या स्वत:चा तसेच किरण पठारे व सुरेंद्र पठारे यांचे फोटो लावले आहेत.
हे पाहून राजाराम पठारे याने माझा भाऊ बाळासाहेब पठारे यांचा फ्लेक्सवरती फोटो का लावला नाही, असे विचारले.
त्यावर कैलास पठारे याने उत्सवाच्या स्टेजचा खर्च मी स्वत: केलेलो आहे.
त्यामुळे फ्लेक्सवर कोणाचा फोटो लावायचा तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असे म्हणाले.
तेव्हा राजाराम पठारे याने सौरव पठारे याला घरातून लोखंडी रॉड व लाकडी काठ्या आणण्यास सांगितले.
त्या चौघांनी मिळून कैलास पठारे यांना बेदम मारहाण केली. शिवीगाळ करुन सौरव याने तुझा मर्डर करतो,
अशी धमकी दिली. कैलास पठारे यांनी उपचार घेतल्यानंतर फिर्यादी दिली असून सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | A young man was beaten with an iron rod for not putting a photo next to former MLA Bapusaheb Pathare on Flex

 

हे देखील वाचा :

Pune Accident News | हडपसरमध्ये भीषण अपघात ! मिक्सर कंटेनरने 4 रिक्षा आणि कारला दिली धडक; 1 ठार तर 3 जखमी

Maharashtra Police | तब्बल 9 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ते झाले पोलीस उपनिरीक्षक; 44 पोलीस हवालदारांना मिळाली पदोन्नती

Pune Cyber Crime | ‘लोन ॲप’ प्रकरणात पुण्याच्या सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! बंगळुरूच्या कॉल सेंटरमधील 9 जणांना अटक

 

Related Posts