IMPIMP

Pune Cyber Crime | ‘लोन ॲप’ प्रकरणात पुण्याच्या सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! बंगळुरूच्या कॉल सेंटरमधील 9 जणांना अटक

by nagesh
Pune Cyber Crime | Big action of Pune's cyber police in 'loan app' case! 9 people arrested in Bangalore's call center

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Cyber Crime | महिलेला मोबाइलमध्ये ‘लोन ॲप’ डाउनलोड (Online Loan App Download) करायला सांगून तिने मागणी केली नसतानाही कर्ज मंजूर करत त्याचे पैसे व्याजासहित परत करण्यासाठी बदनामी करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन १ लाख ११ हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंगळुरू येथील कॉल सेंटरमधील (Call Center In Bengaluru) ९ जणांना सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) अटक करण्यात आली. लोन ॲपमधून होणारी बदनामी टाळण्यासाठी एका नातीने आपल्या आजीची खून केला तर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केली होती. त्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झाले असून ‘लोन ॲप फसवणूक प्रकरणात पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Pune Cyber Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विघ्नेश मंजुनाथ, गणेश सुब्बारायडू, आकाश एम. व्ही., श्रद्धा सुधाकर गौडा, पार्वती संतोष दास, अश्विनी डी मुरुगन, शिल्पा सुभाष गौडा, प्रिया एस., दीपिका एल. (सर्व रा. बंगळुरू) अशी अटक आरोपींची नावे आहेत. (Pune Cyber Crime)

त्यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) खंडणी, फसवणूक (Cheating Case), अब्रु नुकसानी, धमकावणे आदी विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ फेब्रुवारी ते १० जुन या कालावधीत ऑनलाइन स्वरुपात घडला.  या प्रकरणाचा तपास करून सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून ९ आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले. आरोपींनी या महिलेच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक, छायाचित्रे व माहिती चोरली. त्यानंतर ही छायाचित्रे मॉर्फ करत त्यावर बदनामीकारक संदेश लिहून संपर्क यादीतील लोकांना पाठवित महिलेला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार उघड झाला आहे. न्यायालयाने या ९ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हजारो लोकांचा डाटा

 

‘लोन ॲप’चा वापर करून गुन्हा करणाऱ्या टोळीत आरोपींचा सक्रिय सहभाग असून,
त्यांच्याकडे हजारो लोकांचा डेटा सापडला आहे. या सर्व लोकांकडून त्यांनी खंडणी उकळल्याची शक्यता आहे.
या आरोपींना डाटा व तांत्रिक मदत करणाऱ्या आरोपींचा शोध घ्यायचा आहे.
आरोपींनी विविध व्हॉट्स ॲप क्रमांकावरून पीडितेला धमकावत विविध राज्यातील बँक खात्यांमध्ये पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे.
या आरोपींना सीमकार्ड व बँक खाती कोणी पुरवली याची चौकशी करायची आहे.
आरोपींनी उकळलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची विल्हेवाट कशी लावली,
याचा तपास करून खंडणीची रक्कम हस्तगत करायची आहे.
त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.
न्यायालयाने ती मान्य केली.

 

 

बनावट कॉल सेंटरमधून खंडणीची मागणी

 

आरोपी बंगळुरूमध्ये बनावट कॉल सेंटर चालवत होते. ‘लोन ॲप’ डाउनलोड करणाऱ्यांच्या मोबाइलमधील छायाचित्रांसह माहितीचा आरोपी वापर करायचे.
त्यानंतर पीडित व्यक्तींना बनावट व्हॉट्सअप व इतर मोबाइल क्रमांकाद्वारे धमकावायचे.
पीडित व्यक्तींबद्दलचा बदनामीकारक संदेश त्यांच्या संपर्क यादीतील लोकांना पाठविण्याची धमकी देऊन कर्जाची रक्कम व्याजासहित परत करण्याच्या नावाखाली खंडणीची मागणी करत होते,
असे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Cyber Crime | Big action of Pune’s cyber police in ‘loan app’ case! 9 people arrested in Bangalore’s call center

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | येवलेवाडीतील बेकायदा बांधकामांवर महापालिकेची कारवाई; बेकायदा प्लॉटींग आणि बांधकामांना नोटीसा

Pune PMC News | टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाला प्राधान्य देणार; भूसंपादनाशिवाय पुढील रस्त्याचे काम केले जाणार नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

District Planning Committee (DPC) Pune | अजित पवारांना धक्का? पुणे जिल्हा नियोजन समितीवरील 18 सदस्यांचे पद रद्द

 

Related Posts