IMPIMP

Pune Crime | उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू, डॉक्टरला मारहाण करत क्लिनिकची तोडफोड; हडपसर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Cat dies during treatment, vandalizes clinic by beating doctor; Incidents in Hadapsar area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | पुण्यातील एका पाळीव प्राण्यावर उपचार करणाऱ्या क्लिनिकमध्ये आणलेल्या मांजराचा मृत्यू झाल्याने एका महिलेसह चार अनोळखी व्यक्तींनी डॉक्टरला मारहाण (Beating) करून क्लिनिकची तोडफोड (Vandalism of Clinic) केली. हा धक्कादायक प्रकार (Pune Crime) हडपसर येथील भाजी मंडईजवळील डॉग अॅण्ड कॅट क्लिनिकमध्ये (Dog and Cat Clinic) शनिवारी (दि.10) रात्री साडेसातच्या सुमारास घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी डॉ. रामनाथ येण्याबापू ढगे Dr. Ramnath Yenyabapu Dhage (वय 51, रा. मगरपट्टा रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) रविवारी (दि.11) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह इतर चार अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 142, 143, 146, 147, 325, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे पशू वैद्य (Veterinarian) असून, त्यांचे हडपसर येथील भाजी मंडईजवळ डॉग अॅण्ड कॅट क्लिनिक आहे. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास आरोपींनी उपचारासाठी एक मांजर आणले होते. उपचारादरम्यान त्या मांजराचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मांजर कसे झोपले आता तुला झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

 

आरोपींनी केलेल्या मारहाणीत फिर्य़ादी यांचा हात फ्रॅक्चर झाला.
तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या क्लिनिकमधील वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले.
त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
क्लिनिकमधील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याआधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Cat dies during treatment, vandalizes clinic by beating doctor; Incidents in Hadapsar area

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | लुटायला आले अन् चोरटे स्वत:ची गाडी सोडून पळाले…, पिंपरीतील घटना; नेमकं काय घडलं?

Sushma Andhare | ‘चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा मी …;’ सुषमा अंधारेंनी दिली प्रतिक्रिया

Ajit Pawar – Sharad Pawar Birthday | ‘आजच्या दिवशी मी कोणाची बिनपाण्याची करण्याचं ठरवलं नव्हतं, पण…’ – अजित पवार

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts