IMPIMP

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

निलंबित पोलिसांबाबत केलं मोठं विधान

by nagesh
Chandrakant Patil | 'Now we can take the degree of 6 universities at the same time'; Information of Higher and Technical Education Minister Chandrakant Patil in the hall

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी महात्मा जोतिबा फुले
(Mahatma Jotiba Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao
Patil) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. त्यातच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पिंपरी
चिंचवडमध्ये शाईफेक केल्यानंतर हा मुद्दा अधिकच पेटला. मात्र, त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’, असे पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

 

मी जाहीर माफी मागतो…
जय महाराष्ट्र , महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, महात्मा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. (Chandrakant Patil)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते. मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो.

 

पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे
माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक (Arrest) करण्यात आली आहे,
त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर (Police Officers) व पोलिसांवर निलंबनाची (Police suspended) कारवाई करण्यात आली आहे तीही मागे घ्यावी,
तसेच जर पत्रकारांवर (Journalists) कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे.
माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही.
माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती.

 

Web Title :- Chandrakant Patil | ‘If anyone’s feelings have been hurt by my statement, I apologize publicly’ – BJP leader Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime | तुझ्यामुळे अपघात झाल्याचे सांगून तरुणाला लुटले; पुणे-सातारा रोडवरील घटना

Rohit Shetty | दिग्दर्शक रोहित शेट्टीने केले समृद्धी महामार्गाबद्दल ‘हे’ मोठे वक्तव्य

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार

 

Related Posts