IMPIMP

Sushma Andhare | ‘चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा मी …;’ सुषमा अंधारेंनी दिली प्रतिक्रिया

by nagesh
Sushma Andhare | thackeray group leader sushma andhare criticizes bjp chandrakant patil after ink throwing incident

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजप नेते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी (दि. 10) पिंपरी चिंचवड येथे शाई फेकण्यात आली. यावरून त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या शाईफेक प्रकरणावर सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या शाईफेकीचा निषेध केला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. शाई कुठे वापरायची याचे सर्वांना भान पाहिजे, असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमच्या घामाच्या पैशातून योजना निर्माण होतात. या योजनांवर आणि पैशांवर तुम्ही श्रेयवादाचे राजकारण करू नका. हे लोकांचे पैसे आहेत आणि ते लोकांच्या सोयीसाठी आहेत. तुम्ही कर्म, धर्म संयोगाने त्या खुर्चीवर आहात. याचा अर्थ तुम्ही भाग्यविधाते असल्याच्या थाटात वावरण्याचे काही कारण नाही, अशा शब्दांत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.

 

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचा निषेध मी संसदीय मार्गानेच केला आहे.
चंद्रकांत पाटलांचे विधान प्रचंड दुर्दैवी आहे. त्याच्या निषेधार्थ मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधन प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला.
त्यावर चंद्रकांत पाटील यांनी माझ्याशी चर्चा केली. पाटील म्हणाले, दोन घटना वेगवेगळ्या ठेवा.
समितीबाबत व तुमच्या कामाबाबतही मी काही बोललेलो नाही. तुम्ही राजीनामा का देत आहात, तो देऊ नका.
मात्र, मी माझा निषेध संसदीय पद्धतीने व्यक्त केला आहे. शाई कुठे वापरायची याचे भान मला आहे.
ती शाई किती जास्त बोटांना लागते याचा मी विचार करेन.
भाजपची विचारधारा हरविण्यासाठी बॅलेट बॉक्समधून ती शाई कशी वापरता येईल. यासाठी प्रयत्न करेन,
असे अंधारे यांनी म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sushma Andhare | thackeray group leader sushma andhare criticizes bjp chandrakant patil after ink throwing incident

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar – Sharad Pawar Birthday | ‘आजच्या दिवशी मी कोणाची बिनपाण्याची करण्याचं ठरवलं नव्हतं, पण…’ – अजित पवार

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

Pune Crime | तुझ्यामुळे अपघात झाल्याचे सांगून तरुणाला लुटले; पुणे-सातारा रोडवरील घटना

 

Related Posts