IMPIMP

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 66 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील (Pune Crime) वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 66 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार गणेश अनिल पटेकर Ganesh Anil Patekar (वय – 19 रा. स्नेहा विहार सोसायटी, शिवणे, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. गणेश पटेकर याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर कारागृहात (Nagpur Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

गणेश पटेकर हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याने त्याच्या साथीदारांसह वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, तलवार, चाकू, चॉपर यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दुखापत, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे (FIR) केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत.

 

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गणेश पटेकर याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके (Senior Police Inspector Shankar Khatke), पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 66 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta takes action against 66 inmates under MPDA till date

 

हे देखील वाचा :

Aba Bagul | खासगी शाळांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत द्या, काँग्रेसचे नेते आबा बागुल यांची मागणी

Pune Pimpri Crime | पतीच्या विम्याचे पैसे फ्लॅट खरेदीसाठी गुंतवले, बिल्डरने घातला गंडा; अनेकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर पत्नीवर FIR

Pune Fire Brigade | पुणेकरांच्या मदतीला धावणारे अग्निशमन दलच ‘धोक्यात’?, कंट्रोल रुमपाठोपाठ मुख्य इमारतीचा भाग पडला

 

Related Posts