IMPIMP

Pune Fire Brigade | पुणेकरांच्या मदतीला धावणारे अग्निशमन दलच ‘धोक्यात’?, कंट्रोल रुमपाठोपाठ मुख्य इमारतीचा भाग पडला

by nagesh
Pune Fire Brigade | Fire brigade rushing to the aid of Pune residents 'in danger' ?, part of main building collapsed after control room

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Fire Brigade | ऊन, वारा, पाऊस काहीही असो, कोणतीही दुर्घटना झाली की तेथे सर्वप्रथम धावून जाऊन मदत करणारे अग्निशमन दलच आता धोक्यामध्ये आले आहे. दोन दिवसांपूर्वी भवानी पेठेतील (Bhavani Pethe) अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) नियंत्रण कक्षातील (Control Room) छताचा काही भाग कोसळला होता. मुख्य इमारतीचा काही भाग पडला असून सुदैवाने या दोन्ही घटनेमध्ये कोणालाही काही दुखापत झाली नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अग्निशमन (Pune Fire Brigade) मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात शनिवारी सायंकाळी पीओपीचे सिलिंग ढासळले. सुदैवाने त्यात कोणाला लागले नाही. आज सकाळी मुख्य इमारतीचा समोरील सिलिंगचा काही भाग कोसळला. ही प्रकार किरकोळ असला तरी मोठ्या घटनेची नांदी ठरु शकते.

 

 

भवानी पेठेतील अग्निशमन दलाचे मुख्यालय हे 1990 पूर्वी बांधण्यात आले आहे. ही इमारत जुनी झाली असून ती पाडून तिच्या जागी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव (Proposal) गेल्या 2 वर्षांपासून पडून आहे. कोरोनामुळे या प्रस्ताव पुढे सरकला नाही. या ठिकाणचे मुख्यालय हलवून त्यानंतर ही इमारत पाडून तेथे नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे. आता लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे हे काम तातडीने होण्याची निकड समोर आली आहे. नाही तर लोकांना संकटातून वाचविणार्‍या अग्निशमन दलाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना वाचविण्याची वेळ येऊ नये.

 

 

Web Title : Pune Fire Brigade | Fire brigade rushing to the aid of Pune residents ‘in danger’ ?, part of main building collapsed after control room

 

हे देखील वाचा :

Pune Crime | इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेट्सवरुन अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप वार

Dandruff | कोंडा दूर करण्यासाठी करा ‘या’ गोष्टीचा वापर

Money Making Tips | 1 हजार रुपये गुंतवून जमवू शकता 30 लाखापेक्षा जास्त फंड, जाणून घ्या काय आहे स्कीम

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होणार; ‘या’ दिवशी होणार शस्त्रक्रिया

 

Related Posts