IMPIMP

Pune Crime | राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या व्याही, जावई आणि एकाविरूध्द गुन्हा ! व्यावसायिक व न्यायालयाच्या फसवणूकीचे प्रकरण; कोहिनुर ट्रेड होम प्रा. लि. कंपनीच्या शंकर काळभोरांविरूध्द FIR

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | कंपनीचा बनावट शिक्का आणि सही करुन व्यावसायिक आणि न्यायालयाची (Court) फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बाप – लेकाच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 डिसेंबर 2017 ते 28 मार्च 2019 या कालावधीत घडला आहे. रोहित शंकर काळभोर Rohit Shankar Kalbhor (वय-35) आणि शंकर नामदेव काळभोर Shankar Namdev Kalbhor (वय-58 दोघे रा. से.नं. 25 प्लॉट नं 238, जैन मंदिर रोड, मदनलाल धिंग्रा मैदानाजवळ, प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बाप-लेकाची नावे आहेत. याबाबत पवन मनोहरलाल लोढा Pawan Manoharlal Lodha (वय-34 रा. नितेश कुंज, प्लॉट नं.2, सेक्टर 24, निगडी प्राधीकरण) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे (Pune Crime).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

लोढा यांनी अ‍ॅड. सागर टिळक (Adv. Sagar Tilak) यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांच्या तक्रार अर्जाची दखल करून पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पवन लोढा यांची खराबवाडी चाकण येथे एक्साय अँलईज प्रा. लि. नावाची कंपनी आहे.
या कंपनीत भंगार माल स्क्रॅप करून त्यापासून ॲल्युमिनियमचे (Aluminum) सळ्या, पत्रे, लगड बनवले जातात.
काळभोर हे फिर्यादी यांना भंगार मालाचा पुरवठा करतात. रोहित काळभोर यांनी कोहिनुर ट्रेड होम. प्रा. लि. (Kohinoor Trade Home. Pvt.) मार्फत नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 या कालावधीत ॲल्युमिनियम भंगार मालाचा पुरवठा केला.
त्याप्रमाणे फिर्यादी यांच्या कंपनीने काळभोर यांना सर्व टॅक्स व करासहीत पैसे दिले.

 

 

दरम्यान, रोहित काळभोर याने अमानत (Security) म्हणून धनादेश देण्याची मागणी फिर्यादी यांच्याकडे केली.
त्यानुसार फिर्यादी यांनी 10 लाखाचे 7 आणि 8 लाख 92 हजार 658 रुपयाचा एक असे एकून 78 लाख 92 हजार 658 रुपयांचे 8 चेक रोहित काळभोर यांच्या कोहिनुर ट्रेड होम प्रा. लि. च्या नावे दिले.
फिर्यादी यांनी आरोपींचे सर्व पैसे दिले असताना आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांनी दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करुन 4 डिसेंबर 2017 रोजी तारीख टाकून बँकेत भरले.
आरोपी धनादेशाचा गैरवापर करतील अशी शंका फिर्यादी यांना आल्याने त्यांनी कॉसमॉस बँक शाखा भोसरी (Cosmos Bank Branch Bhosari) यांनी आरोपींना दिलेल्या धनादेशाचे पेमेंट स्टॉप करण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी पेमेंट स्टॉप केल्याने आरोपींनी बँकेत भरलेले धनादेश वटले नाहीत.
त्यामुळे आरोपींनी फिर्यादी यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवून फिर्यादी व त्यांच्या कंपनीच्या संचालकाविरुद्ध पिंपरी न्यायालयात (Pimpri court) फौजदारी खटला दाखल केला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

न्यायालयात खटला दाखल करताना आरोपींनी फिर्य़ादी यांच्या सही व कंपनीचे शिक्के वापरून कंपनीचा खाते उतारा न्यायालयात सादर केला.
तसेच खोटी फौजदारी तक्रार, खोटे शपथपत्र दाखल केले.
आरोपींनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रे हस्ताक्षर पडताळणीसाठी पाठवले.
त्या अहवालाचे अवलोकन करता स्पष्ट दिसून आले की,
आरोपींनी सादर केलेल्या खाते उताऱ्यावरील सही व फिर्यादी यांची सही यामध्ये बरीच तफावत आहे.
आरोपींनी फिर्यादी आणि न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

 

दरम्यान, आरोपी शंकर नामदेव काळभोर (Shankar Namdev Kalbhor),
रोहीत शंकर काळभोर (Rohit Shankar Kalbhor) आणि रोहन शंकर काळभोर (Rohan Shankar Kalbhor)
यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) वडिलोपार्जीत मालमत्ता आपल्या नावावर करुन घेत फसवणूक केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शंकर काळभोर यांचे बंधू ज्ञानोबा नामदेव काळभोर (Gyanoba Namdev Kalbhor)
यांनी 20 जानेवारी 2022 रोजी फिर्याद दिली आहे.
आरोपी शंकर काळभोर याने फिर्यादी (ज्ञानोबा नामदेव काळभोर) यांच्या वडिलांचा अंगठा करुन आणि फिर्यादी यांची खोटी सही करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी शंकर काळभोर हे एका राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांचे व्याही आहेत.
तर रोहन काळभोर हे जावई असल्याचं संबंधितांकडून सांगण्यात आलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात काळभोर यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला असून पुढील सुनावणी
3 मार्च रोजी होणार असल्याची माहिती अ‍ॅड. सागर टिळक (Adv. Sagar Tilak) यांनी दिली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Crimes against the son in law and other relatives of the Maharashtra State President of one of the National Party FIR against Kohinoor Trade Home Pvt Shankar Kalbhor and rohit kalbhor

 

हे देखील वाचा :

Pune Police | कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंद्दे बोकाळले ! वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’शी सलग्न, पोलिस आयुक्तांची कारवाई

Pune NCP | सत्ताधाऱ्यांनी महापालिकेची परंपरा मोडीत काढली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

Earn Money | घरबसल्या 1 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ शानदार बिझनेस, दर महिना होईल 60,000 रुपयांची कमाई

Narayan Rane | ‘दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर….’; नारायण राणेंचा नेमका कोणत्या मंत्र्यावर निशाणा !

 

Related Posts