IMPIMP

Pune Police | कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंद्दे बोकाळले ! वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’शी सलग्न, पोलिस आयुक्तांची कारवाई

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Police | कात्रज (Katraj) आणि भारती विद्यापीठ परिसरात (Bharti Vidyapeeth Area) अवैध धंद्दे (Illegal Business) बोकाळल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर कारवाई केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar) यांना 7 दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी (Pune Police Control Room) संलग्न करण्यात आलं आहे. याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित वरिष्ठ निरीक्षकावरील कारवाईस दुजोरा दिला आहे. दरम्यान, आगामी काळात देखील ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्दे सुरू असल्याचं निदर्शनास येईल त्या संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर तसेच संबंधित कर्मचार्‍यावर कठोर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Pune Police)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गेल्या काही दिवसांपासुन भारती विद्यापीठ परिसरात तसेच कात्रज भागात मोठया प्रमाणावर अवैध धंद्दे सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना मिळाली होती. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले काही ‘राज’ अवैध धंद्देवाल्यांकडून ‘वगैरे-वगैरे’ मार्गातून मलई गोळा करण्यात मग्न असल्याची देखील चर्चा सुरू आहे. दरम्यान, परिसरात अवैध धंद्दे सुरू असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे (Bharti Vidyapeeth Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना आगामी 7 दिवसांसाठी नियंत्रण कक्षाशी सलग्न करण्यात आले असून पोलिस स्टेशनचा चार्ज ठाण्यातीलच पोलिस निरीक्षकाकडे (सेकंड पीआय) देण्यात आला आहे. (Pune Police)

यापुर्वी वेळोवेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुठलेही अवैध व्यवसाय सुरू होता कामा नये असा आदेश दिला होता. हद्दीत अवैध धंद्दे सुरू असल्याचं आढळून आल्यास संबंधित पोलिस निरीक्षकावर तसेच संबंधित पोलिस कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात येईल हे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यापुर्वीच स्पष्ट केलं होतं. कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरातील धंद्यांबाबत वेळोवेळी कानावर येत होतं. अवैध धंद्दे सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी थेट वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर कारवाई केल्यानं अनेक अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पुणे शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Police News | Illegal trades boom in Katraj-Bharati Vidyapeeth Area ! Action taken by the Commissioner of Police Amitabh Gupta, Senior Inspector Jagannath Kalaskar attached to city control room

 

हे देखील वाचा :

Pune NCP | सत्ताधाऱ्यांनी महापालिकेची परंपरा मोडीत काढली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

Earn Money | घरबसल्या 1 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ शानदार बिझनेस, दर महिना होईल 60,000 रुपयांची कमाई

Narayan Rane | ‘दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर….’; नारायण राणेंचा नेमका कोणत्या मंत्र्यावर निशाणा !

Corporator Archana Tushar Patil | पुणे पालिकेत उभारणार क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र

 

Related Posts