IMPIMP

Narayan Rane | ‘दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर….’; नारायण राणेंचा नेमका कोणत्या मंत्र्यावर निशाणा !

by nagesh
Narayan Rane | breaks alliance to get cm post bjp leader and union minister narayan rane criticizes shiv sena at nashik

सरकारसत्ता ऑनलाइन – Narayan Rane | भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादंग होताना दिसत आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता पुन्हा अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh) आणि दिशा सालियनच्या (Disha Salian) मृत्युबाबत धक्कादायक दावा केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दिशा सालियनाची 8 जूनला बलात्कार करून हत्या झाली. याबाबतची माहिती अभिनेता सुशांत सिंहला समजली त्याने आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुशांत सिंह राजपूतला घरी जाऊन मारण्यात आल्याचा दावा नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. राणेंनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे.

 

दिशा सालियनला जबरदस्तीने पार्टीला बोलवण्यात आले. या पार्टीसाठी (Party) तिला तिचाच मित्र म्हणजे रोहन रायने (Rohan Rai) बोलावले. त्या पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी त्या फ्लॅटच्या बाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते ?, असा सवाल नारायण राणेंनी केला. त्यामुळे नारायण राणेंनी या प्रकरणाबाबत बोलताचा त्यांचा रोख नेमका कोणत्या मंत्र्याकडे आहे ?, असा सवाल उपस्थित झाला आहे.

 

दरम्यान, सुशांतला हे सर्व समजल्यावर त्याने आपण यातील कोणाला सोडणार नाही, असं म्हणायला सुरूवात केली.
त्यानंतर सुशांतच्या घरी काही जण गेले त्यावेळी सुशांत आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यावेळी सुशांतची हत्या झाल्याचं राणेंनी सांगितलं. त्यावेळी सुशांतच्या घराबाहेर कोणत्या मंत्र्याची गाडी होती ?,
सुशांतच्या इमारतीतील सीसीटीव्ही (CCTV) होते मात्र हत्येनंतर ते सीसीटीव्ही गायब झाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सुशांतचा मृतदेह रूग्णालयात नेताना एका ठराविक व्यक्तीची रूग्णवाहिका (Ambulance) का होती, रूग्णालयातील सर्व पुरावे कोणी नष्ट केले ?,
सगळ्या तपासात कोणत्या पोलीस (Police) अधिकाऱ्यांचा समावेश होता, याबाबतची माहिती आम्हाला आहे.
मी याबाबतचे सर्व पुरावे संबंधित तपास यंत्रणांना देणार आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुन्हा होऊ शकतो, असं राणे म्हणाले.

 

Web Title :- Narayan Rane | bjp leader and union minister narayan rane new accusation in disha salian case and sushant singh rajput case

 

हे देखील वाचा :

Corporator Archana Tushar Patil | पुणे पालिकेत उभारणार क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र

Multibagger Stocks | ‘या’ शेयरमध्ये 1 लाख लावणार्‍यास दिड महिन्यात झाला 3.7 लाखांचा नफा

Multibagger Penny Stock | ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, काही महिन्यात 1 लाखाचे झाले 5.9 कोटी

Pune Crime | वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन अश्लिल शिवीगाळ; धानोरीतील 28 वर्षीय तरूणीचा विनयभंग

 

Related Posts