IMPIMP

Pune Crime | पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला 5 लाखाच्या खंडणीची मागणी; 4 लाख घेताना तिघांना खंडणी विरोधी पथकानं पकडलं

by nagesh
Pune Crime | Ransom demanded for delivery of household goods to Mumbai Crimes against owners of Sun Life Packers & Movers and Dhareshwar Packers & Movers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | प्लॉटवर टाकलेला राडा रोडा उचलण्यासाठी ४ लाख रुपयांची खंडणी मागून ती घेत असताना खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell) सापळा रचून तिघा जणांना रंगेहाथ (Pune Crime) पकडले.

 

दीपक विजय निंबाळकर Deepak Vijay Nimbalkar (वय २९, रा. निंबाळकरवस्ती, पिसोळी, ता. हवेली), गणेश जगताप (वय २८, रा. महम्मदवाडी, हडपसर) आणि अमर अबनावे (वय २९ रा. उरळी देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी जुबेर बाबु शेख juber babu shaikh (वय ४१, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. जुबेर शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस (NCP Pune) आहेत. त्यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांचे पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत. त्याकडे जाणार्‍या रस्त्यावर दिपक निंबाळकर याने राडारोडा टाकला होता. तो राडारोडा उचलण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मित्र सचिन ननावरे यांनी फोन करुन सांगितले. हा राडारोडा उचलण्यासाठी दीपक निंबाळकर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी केली. त्यांना पैसे घेऊन कोंढवा कात्रज रोडवरील (Katraj Kondhwa Road) कान्हा हॉटेल येथे बोलावले. शेख यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली. सोमवारी दुपारी शेख हे ४ लाख रुपये घेऊन कान्हा हॉटेल येथे गेले. शेख यांच्याकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी तिघांना सापळा (Pune Crime) रचून पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील (pune police crime branch) खंडणी विरोधी पथकाचे (2) पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे,
PSI श्रीकांत चव्हाण, ASI गुरव, PH प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंखे, PN संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे,
सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, प्रविण पडवळ, PC प्रदीप गाडे, चेतन शिरवळकर, LPC रुपाली कर्णावर यांच्या पथकानं आरोपींना अटक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Demand for Rs 5 lakh ransom from NCP office bearers in Pune; While taking Rs 4 lakh, three were caught by the Anti Extortion Cell of pune police crime branch

 

हे देखील वाचा :

High Court | लहान मुलांसोबत ‘ओरल सेक्स’ गंभीर गुन्हा नाही – उच्च न्यायालय

Pune Crime | पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे पलायन

Universal Pension System | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! वाढू शकते निवृत्तीचे वय अन् पेन्शनची रक्कम, मोदी सरकार करतंय विचार, जाणून घ्या

 

Related Posts