IMPIMP

Pune Crime | पुण्यात लोहगावमधील दोन कुटुंबामध्ये भररस्त्यात ‘राडा’ ! परस्पराविरोधात विनयभंगाच्या तक्रारी करणार्‍या 12 जणांना अटक, कारण ऐकून तुम्ही व्हाल ‘चकीत’

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरात बंदिस्त झाले असताना अनेकांचे प्राणीप्रेम उफाळून आले. कुत्री, मांजरी पाळण्याचे फॅड वाढले. त्याचवेळी प्राण्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारी मात्र सार्वजनिक रस्त्यांवर सोपविण्याचे प्रमाण वाढले. त्यातूनच लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीतील सार्वजनिक रोडवर दोन कुटुंबामध्ये राडा झाला. हा राडा इतका वाढला की दोन्ही कुटुंबांनी परस्पराविरुद्ध विनयभंगाच्या तक्रारी दिल्या. विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) दोन्ही कुटुंबातील 12 जणांना अटक केली आहे. हा प्रकार भुकण वस्तीतील गुरुद्वारा कॉलनीतील सार्वजनिक रोडवर २ ऑक्टोंबरला रात्री साडेनऊ वाजता (Pune Crime) घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी एका 55 वर्षाच्या गृहस्थाने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या कॉलनीतील एका महिला रात्री त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना तुमच्या पाळीव कुत्र्याला संडासाकरीता बसवू नका, असे सांगितले. त्यावरुन या महिलेच्या कुटुंबातील 7 जण दुचाकीवरुन आले. त्यांनी लाकडी बांबुने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीचे साडीला पकडून त्यांचे केसाला धरुन खाली पाडुन अश्लिल शिवीगाळ केली. विमानतळ पोलिसांनी (गु. र. नं. 319/21) 354, 324, 143,147, 149 कलमानुसार गुन्हा दाखल करुन दोन महिलांसह 7 जणांना अटक केली आहे.

त्याविरोधात एका 24 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांच्या पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन गेल्या होता.
त्यावेळी तेथेच राहणार्‍या आरोपीने फिर्यादी यांच्या कुत्र्यास दगड मारला.
फिर्यादी यांनी त्याला जाब विचारल्यावर त्याने अश्लिल शिवीगाळ करुन फिर्यादीचा हात धरुन पिरगळला.
फिर्यादीची आई जाब विचारण्यासाठी गेल्या असताना सर्वानी मिळून फिर्यादी व त्यांच्या आईला हाताने,
लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
विमानतळ पोलिसांनी (गु. र. नं. 320/21) 354, 323, 153, 147, 149, 504, 506, 427 कलमानुसार गुन्हा दाखल करुन पाच जणांना (Pune Crime) अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाठक अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | dispute between two families in Lohgaon, Pune! 12 arrested for molesting each other, viman nagar police

 

हे देखील वाचा :

Ramdas Kadam | अनिल परब आणि रामदास कदम यांच्या वादात शिवसेना मध्यस्थी करणार? कदमांची आमदारकी जाणार?

Ajit Pawar | पुणे, नाशिकच्या सुरक्षिततेसाठी नगर जिल्ह्यात लाॅकडाउनचा निर्णय

Pune Crime | नोकरी गेल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नंतर स्वत:वर वार करुन तरुणानं आपलं जीवन संपवलं

 

Related Posts