IMPIMP

Pune Crime | वृत्तपत्रात बदनामी करण्याची धमकी देऊन 5 लाखांची खंडणी वसुल करणार्‍या चौघा तोतया पत्रकारांना अटक, महिला संपादकासह 6 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime News | Extortion demanded by the crime branch in the name of Mathadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | वृत्तपत्रातून बदनामी करण्याची तसेच खूनाची (Murder) धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या एका महिलेस ६ तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील चौघांना मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्षमणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच योगेश नागपूरे आणि आत्मज्योतीच्या संपादक संजिवनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार केशवनगर येथील दत्त कॉलनीमधील एका गोदामात २३  ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका ४२ वर्षाच्या व्यावसायिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे केशवनगर येथील दत्त कॉलनीत गोदाम आहे.
प्रमोद साळुंके, वाजीद सय्यद हे गोदामात आले. गोदामाच्या बाहेर मंगेश तांबे, योगेश नागपूरे, लक्ष्मणसिंग तंवर
हे थांबले होते. प्रमोद साळुंखे याने एका इंग्रजी वृत्तपत्र व आत्मज्योती पेपरचा पत्रकार असल्याचे सांगितले.
तुमच्या गोदामामध्ये भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री करुन दोन नंबरचा धंदा करता.
यापूर्वी गुटख्याची विक्री करुन खूप पैसा कमावला आहे. आता पेपरमध्ये बातमी लावून बदनामी करुन पूर्णपणे बरबाद करुन टाकतो. जर पैसे दिले नाही तर खानदानाचा खूनच करुन टाकतो, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांच्या मुलाला हाताने मारहाण केली. पत्नी व मुलाला गोदामाच्या बाहेर पडण्यास अटकाव केला.
प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद यांनी स्वत:साठी व त्यांचे साथीदार मंगेश तांबे, योगेश नागपूरे, लक्ष्मणसिंग तंवर
व आत्मज्योती पेपरच्या संपादक संजिवनी कदम यांच्यासाठी फिर्यादी यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी
जबरदस्तीने वसुल करुन निघून गेले. फिर्यादी हे या प्रकाराने घाबरून गेले होते.
त्यांनी मंगळवारी रात्री ही बाब मुंढवा पोलिसांना कळविली.
त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन तातडीने आरोपींचा शोध घेऊन मध्यरात्रीनंतर चौघांना अटक केली आहे.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे (Senior Police Inspector Ajit Lakde) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक करपे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Four fake journalists arrested for extorting Rs 5 lakh by threatening to defame newspaper, FIR filed against 6 including female editor

 

हे देखील वाचा :

BJP MLA Nitesh Rane | बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे पोलिसांवर भडकले

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांना मनसेचा सवाल, पक्षाच्या पदाधिकार्‍याने महिलेला अमानुष मारहाण केल्यावर आता गप्प का?

Bhaskar Jadhav | 100 रुपयांच्या शिधावरुन भास्कर जाधवांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

 

Related Posts