IMPIMP

BJP MLA Nitesh Rane | बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे पोलिसांवर भडकले

by nagesh
BJP MLA Nitesh Rane | nitesh rane at ulhasnagar police station after allegations of police beaten bajarang dal supporters

उल्हासनगर :  सरकारसत्ता ऑनलाइन   – बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप उल्हासनगर (Ulhasnagar) पोलिसांवर होत आहे. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी पोलिसांची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करा, अशी मागणी नितेश राणेंनी (BJP MLA Nitesh Rane) केली. तसेच बदली न केल्यास पुढची कार्यवाही करु, असा इशारा देखील राणे यांनी दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावर नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) म्हणाले, धर्मांतराला विरोध करणाऱ्या बंजरंग दलाच्या हिंदू कार्यकर्त्याला मारणार असाल, तर आम्ही ते सहन करणार नाही. असा इशारा नितेश राणे यांनी पोलिसांना दिला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांना जाब विचारण्यासाठी नितेश राणे उल्हासनगर पोलिस ठाण्यात (Ulhasnagar Police Station) गेले होते.

 

8 ऑक्टोबर 2022 रोजी उल्हासनगर शहरातून 26 वर्षीय तरुण आणि 24 वर्षीय तरुणी घरातून पळून गेले होते. या दोघांचा शोध घेतला असता, दोघेही पश्चिम बंगालमधील (West Bengal) एका गावात लपून बसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीचे तिच्या घरच्यांसोबत फोनवरुन संभाषण करून दिले होते.

 

 

या तरुणीने घरातून पळून जाताना दागिने चोरुन नेल्याची तक्रार मुलीच्या घरच्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली होती.
त्यावेळी तक्रार करण्यासाठी आलेल्या मुलीच्या नातेवाईकांना आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता.
त्यामुळे नितेश राणे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना मारहाण केल्याचा जाब विचारला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात हिंदुत्वावादी सरकार आहे. त्यामुळे जर का पोलीस हिंदू विरोधी वागत असतील.
त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार केली जाईल.
या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करा, अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असे राणे यावेळी म्हणाले.

 

Web Title :- BJP MLA Nitesh Rane | nitesh rane at ulhasnagar police station after allegations of police beaten bajarang dal supporters

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांना मनसेचा सवाल, पक्षाच्या पदाधिकार्‍याने महिलेला अमानुष मारहाण केल्यावर आता गप्प का?

Bhaskar Jadhav | 100 रुपयांच्या शिधावरुन भास्कर जाधवांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटातील नाराज आमदार भाजपमध्ये जाणार? राष्ट्रवादीचा मोठा दावा

 

Related Posts