IMPIMP

Pune Crime News | सुट्टे पैसे मागून डॉक्टरांच्या नावाने 2 लाखांची फसवणूक; एका पाठोपाठ 2 गुन्हे दाखल

by nagesh
Pune Crime News | 2 lakh fraud in the name of doctor by asking for free money; 2 cases filed one after the other

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | सोन्याचे दागिने बनवायचे असल्याचे सांगून त्याचे डिझाईन घेण्यासाठी या, असे सांगून तुमच्या सुट्टे पैसे असेल, तर घेऊन या मी २ हजार रुपयांच्या नोटा देते, असे सांगून एका सराफाच्या व्यवस्थापकाला तब्बल २ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. अशाप्रकारे सहकारनगरमध्ये (Sahakar Nagar) एका मेडिकल दुकानदाराला १० हजार रुपयांना गंडा (Fraud Case) घालण्यात आला. (Pune Crime News)

 

याबाबत एका सराफाच्या व्यवस्थापकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. वाघोली येथील एका सराफाला सोन्याचे दागिने बनवायचे असल्याचे सांगितले. दागिन्यांचे डिझाईन मोबाईलमध्ये आहे. ते पाहून माप घेण्यासाठी बोलावले. तुमच्याकडे सुट्टे पैसे असतील तर ते घेऊन या. माझ्याकडे ४ लाख रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नोटा आहे,असे एका महिलेने सांगितले. त्यानुसार सराफाचा व्यवस्थापक केअर हॉस्पिटलमध्ये गेला. तेथे एक मुलगा त्यांना घेऊन तिसर्‍या मजल्यावर गेला. आई आतमध्ये आहे, त्यांच्याकडून माप घ्या व पैसे घ्या असे सांगून त्यांच्याकडील २ लाख रुपये घेऊन तो खाली गेला. प्रत्यक्षात तेथे कोणी नव्हते. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

असाच प्रकार सहकारनगरमधील प्रेमस कॉर्नर या इमारतीत घडला.
फिर्यादी यांना आपण डॉ. जोशींची मिसेस बोलत असल्याचे सांगितले.
एक कंबरेचा पट्टा व वॉकर हॉस्पिटलला पाठविण्यास सांगितले. तसेच जर तुमच्याकडे सुट्टे पैसे असतील तर पाठवा,
मी २ हजार रुपयांच्या तेवढ्या नोटा देईन,असे सांगितले. त्यांनी आपल्या नोकराला कंबरेचा पट्टा व वॉकर आणि
५०० रुपयांच्या २० नोटा असे १० हजार रुपये घेऊन पाठविले. त्यावेळी या नोकराला जिन्यात एक जण भेटला.
मला जोशी मॅडमने पाठविले असून सुट्टे पैसे माझ्याकडे द्या. हा माल तिसर्‍या मजल्यावर देऊन या,
मी तुला पैसे देण्यासाठी खाली मेडिकलमध्ये थांबतो, असे सांगून तो त्यांच्याकडील १० हजार रुपये घेऊन
फसवणूक (Cheating Case) करुन निघून गेला.

 

 

Web Title :- Pune Crime News | 2 lakh fraud in the name of doctor by asking for free money; 2 cases filed one after the other

 

हे देखील वाचा :

Prithviraj Chavan | ‘…नैतिकतेच्या आधारावर सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अन्’, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Maharashtra Political Crisis | कोश्यारींनी बहुमत चाचणीला बोलवणे अयोग्य, सुप्रीम कोर्टाने फटकारले

 

Related Posts