IMPIMP

Pune Crime News | दुकानदाराकडून महिला कामगाराचा विनयभंग, पुण्यातील घटना

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | सफाई कामगार महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी पेरणे फाटा येथील एका दुकानदारावर लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पेरणे फाटा येथील एका शॉपमध्ये 27 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पेरणे फाटा येथे राहणाऱ्या 35 वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) बुधवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शॉपचा मालक साहेबराव राठोड (महाराज) वय- 50 रा. बाळाबाई तांडा, अहमदनगर) याच्यावर आयपीसी 354, 354अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड याचे पेरणे फाटा येथे शॉप आहे. याठिकाणी फिर्यादी महिला साफसफाई करण्याचे काम करते. 27 ऑक्टोबर रोजी महिला राठोड याच्या दुकानात साफसफाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी राठोड याने महिलेसोबत गैरवर्तन केले. महिलेने त्याला विरोध केला असता त्याने ‘हा शॉप तुझ्या नावावर करतो’ असे म्हणत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घाबरलेल्या महिलेने पोलिसांत धाव घेत आरोपी राठोड विरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.

Related Posts