IMPIMP

Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगार छोट्या बलकवडे याच्यावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 53 वी स्थानबध्दतेची कारवाई

by sachinsitapure
IPS Ritesh Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MPDA Action | अलंकार पोलीस ठाण्याच्या (Alankar Police Station) हद्दीत विनयभंग, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करुन परिसरात दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार नरेंद्र उर्फ छोट्या बलकवडे याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 53 वी कारवाई आहे. (Pune Police MPDA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नरेंद्र उर्फ छोट्या महादेव बलकवडे (वय-35 रा. मेंहदळे गॅरेजसमोर, गणेशनगर, एरंडवणे, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने साथीदारांसह अलंकार पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चाकू यासारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दुखापत, दंगा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Police MPDA Action)

आरोपी विरोधात मागील पाच वर्षात 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी नरेंद्र उर्फ छोट्या बलकवडे याला एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कामगिरी अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे व पथकाने केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून नागरिकांमध्ये
दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार, एम.पी.डी.ए. सारख्या कारवाया केल्या आहेत.
यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया केल्या जणार आहेत. पोलीस आयुक्तांनी आज पर्यंत पुणे शहरातील 53 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

Related Posts