IMPIMP

Pune Crime News | रुमचे भाडे मागितल्याने केली शिवीगाळ, जाब विचारणाऱ्या दोघांवर चाकूने हल्ला करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Abusing them for asking for room rent, they attacked two people who were asking for money and tried to kill them with a knife.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मैत्रिणीला तिच्या रुममेटने भाडे मागितल्याने त्याने शिवीगाळ केली. त्याची विचारणा केल्याने दोघांवर चाकूने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

याबाबत अजिंक्य कमलाकर जायभाये (वय २४, रा. शाहू कॉलनी, कर्वेनगर) याने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २८८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चैतन्य आडे (रा. वारजे, मुळ पुसद) आणि चिराग वानखेडे यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार वारजे येथील केटीएम शोरुमजवळ (KTM Showroom Warje) शनिवारी दुपारी अडीच वाजता घडला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व फिर्यादीचा मित्र कृष्णा देऊलकर हे त्यांच्या घरी होते. कृष्णाची नातेवाईक मोहिनी स्वामी हिने तिची रुममेट रिनल हिस घर भाडे मागितले. त्यावर रिनलचा मित्र चैतन्य आडे याने मोहिनी स्वामी हिस फोनवरुन शिवीगाळ केली.

हे समजल्यावर कृष्णा देऊलकर याने चैतन्य आडे याला जाब विचारला.
त्याचा राग मनात धरुन चैतन्य व त्याचा मित्र चिराग वानखेडे यांनी अजिंक्य जायभाये व कृष्णा देऊलकर
यांना वाटेत गाठून त्यांच्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Abusing them for asking for room rent, they attacked
two people who were asking for money and tried to kill them with a knife.

Related Posts