IMPIMP

Pune Crime News | अट्टल गुन्हेगार विवेक यादव याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

by nagesh
Pune Crime News | Action under MPDA Act against pune criminal Vivek Yadav

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारूचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार विवेक बबलु यादव Vivek Bablu Yadav (46, रा. रामदरा रोड, बल्लाळेवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरूध्द पोलिस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. (Pune Crime News)

विवेक यादवने त्याच्या साथीदारांसह लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारू तयार करणे, विक्री करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. गत 5 वर्षामध्ये त्याच्याविरूध्द 5 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास व जिवीतास धोका निर्माण होवून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Crime News)

लोणी काळभोर पोलिस स्टेशनने सादर केलेला प्रस्ताव आणि
इतर कागदपत्रांची पडताळणी करून पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी यादव याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला 1 वर्षाकरिता स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) स्थानबध्द करण्यात आले आहेत. लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एल. चव्हाण (Sr. PI. D.L. Chavan) यांनी सदर प्रस्ताव सादर केला होता. तर कागदपत्रांची पडताळणी गुन्हे शाखेतील पीसीबीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी केली होती.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारपासुन आतापर्यंत 20 जणांविरूध्द
एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे. आगामी काळात देखील सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा
प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title : Pune Crime News | Action under MPDA Act against pune criminal Vivek Yadav

Related Posts