IMPIMP

Pune Crime News | सहा महिन्यापूर्वीच्या वादातून तरुणाला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime News | Neighboring hoteliers beat up them for giving free soup on food

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | फुटबॉल खेळण्यावरुन सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून तरुणाला अल्पवयीन मुलांच्या
टोळक्याने कोयता व लाकडी बांबुने मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune
Police) चौघा अल्पवयीन मुलांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी अब्दुल्ला आमीरउल्ला खान (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८२/२३) दिली आहे. हा प्रकार गजराज चौकात २८ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता घडला. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी फुटबॉल खेळण्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरुन फिर्यादी हे त्यांच्या मित्रांबरोर मोटारसायकलवरुन जात होते. तेव्हा लक्ष्मीनगरमधील गजराज चौकात चौघा अल्पवयीन मुलांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर कोयत्याने वार केला. लाकडी बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यांचा मित्र महेश मिश्रा यास लाकडी बांबुने मारहाण करुन परिसरात दहशत निर्माण केली. तेथील दोन रिक्षांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | An attempt to beat a young man to death over an argument six months ago; FIR in Yerwada Police Station

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | संत तुकाराम महाराजांवर केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले…

Pune Metro | चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ?

Prisoners Release | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 189 बंद्यांची सुटका

Pune Crime News | पालिकेची कारवाई टाळण्यासाठी मागितली 8 लाखांची खंडणी, महिलेसह दोघांना कोथरुड पोलिसांकडून अटक

 

Related Posts