IMPIMP

Pune Metro | चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ?

by nagesh
Pune Metro | Chandrakantada, what happened to you?

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   पुण्याची मेट्रो (Pune Metro) कधी पूर्ण होणार या प्रश्नावर ‘तारीख पे तारीख’ असेच उत्तर भाजपाने (BJP) तयार ठेवले आहे. याचे कारण म्हणजे गरवारे महाविद्यालय (Garware College) ते न्यायालय (Court) आणि फुगेवाडी (Phugewadi) ते न्यायालय या मार्गावरील मेट्रोचे (Pune Metro) काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा नवा वायदा पुण्याचे पालकमंत्री (Pune Guardian Minister) व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेत केला. आता 26 जानेवारी हा दिवस उलटून गेला. म्हणूनच यावर असे विचारावेसे वाटते की, चंद्रकांतदादा, क्या तुम्हारा वादा ?

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आता म्हणे मार्च महिन्याचा वायदा करण्यात येत आहे. जनतेला वायदे करायचे, आश्वासने द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत ही त्या भाजपची नीती बनली आहे. ‘अच्छे दिन लायेंगे’, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार’, ‘गॅस, पेट्रोल, ‘डीझेल दरवाढ कमी करणार’ , ‘महागाई कमी करणार’, ‘दरवर्षी 2 कोटी नवे रोजगार निर्माण करणार…’ असे असंख्य वायदे भाजपच्या मोदी सरकारने (Modi Government) केले. मुख्य म्हणजे असे अनेक वायदे करताना जनतेला आपण बांधील आहोत असे ते मानत नाहीत. त्यांचे वायदे ‘हेडलाईन मॅनेजमेंट’पुरतेच असतात. चंद्रकांत पाटील देखील याच मुशीत घडले आहेत. त्यामुळे पुण्याच्या मेट्रोबाबत (Pune Metro) प्रत्येकवेळी नवीन वायदे करताना त्यांना ना खंत ना खेद! ‘हेडलाईन छापून येण्यापुरताच त्यांचा पुण्याच्या विकासाशी संबंध आहे. त्यामुळेच आता नवा वायदा करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या खात्यांमध्ये ‘वायदामंत्री’ हे नवे खातेदेखील स्वीकारावे. सुज्ञास अधिक सांगणे न लागे !

दीर्घकालीन पाठ्पुराव्यानंतर काँग्रेस पक्षाने (Congress Party) पुण्यात मेट्रो प्रकल्प आणला.
मात्र भाजप राजवटीत काम रेंगाळले व अखेरीस मागीलवर्षी मार्च महिन्यात जेमतेम 12 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले.
आताही गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम 26 जानेवारीपर्यंत
पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
आता 26 जानेवारी दिवस उजाडला. आता नवा वायदा मार्च महिन्याचा ! तसेच,
पुण्यातील 33 किलोमीटर लांबीचे दोन्ही मेट्रो मार्ग मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत
असल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Metro | Chandrakantada, what happened to you?

 

हे देखील वाचा :

Prisoners Release | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 189 बंद्यांची सुटका

Maharashtra Politics | शरद पवार यांच्या खेळीमुळे, अजित पवारांचा बकरा झाला; चंद्रशेखर बावनकुळेंचा राष्ट्रवादीवर घणाघात

Jacqueline Fernandez | अखेर वर्षभरानंतर कोर्टाने अभिनेत्री जॅकलीनला दिली विदेश प्रवासाला परवानगी

 

Related Posts