IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात भरदिवसा गोळीबार, प्रचंड खळबळ

by sachinsitapure
Firing In Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात भरदिवसा गोळीबार (Pune Firing News) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.30) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीमध्ये देशी बनावटीच्या पिस्तूला मधून गोळीबार (Firing In Pune) केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपींनी दोन राऊंड फायर केले आहे. सिंहगड पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. (Pune Crime News)

आरोपींनी कोणत्या कारणामुळे गोळीबार केला हे अद्याप समजू शकले नाही.
पोलीस संशयित आरोपींकडे कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

Related Posts