IMPIMP

Pune Crime News | कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचा अपहार, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवले यांच्यावर गुन्हा

by sachinsitapure
Sinhagad Institute Embezzlement of Provident

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कर्मचाऱ्यांचा पगारातून भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) कपात करुन 70 लाख 92 हजार 862 रुपयांचा अपहार (Embezzlement) केल्याप्रकरणी सिंहगड इन्स्टिट्यूटचे (Sinhgad Institute) संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2019 ते जून 2022 या कालावधीत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत राहुल एकनाथ कोकाटे (वय 51, रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, तुपेनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मारुती निवृत्ती नवले Maruti Nivrutti Navale (रा. समगिर प्लॉट, टिळेकर नगर, कोंढवा) याच्यावर आयपीसी 406, 409 सह कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना कलम 14 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील टिळेकर नगर परिसरात सिंहगड सिटी स्कूल (Sinhagad City School)
आहे. या शाळेतील 115 ते 136 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधी कपात करण्यात आली.
ऑक्टोबर 2019 ते जून 2022 या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एकूण 74 लाख 68 हजार 626 रुपये कपात करण्यात आले. त्यापैकी 3 लाख 75 हजार 774 एवढी रक्कम भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा केली. उर्वरीत 70 लाख 92 हजार 862 रुपयांचा अपहार केला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मारुती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम भविष्यनिर्वाह निधीत (PF) जमा न करता अपहार
केल्याचे राहुल कोकाटे यांनी फिर्य़ादीत म्हटले आहे. नवले यांच्याविरुद्ध कोकाटे यांनी न्यायालयात फौजदारी दावा
दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने मारुती नवले यांच्याविरुद्ध अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.

Related Posts