IMPIMP

Pune Crime News | पोलीस भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र, दोघांवर FIR

by nagesh
Pune Crime News | fake certificate for police recruitment crime against two candidates in chaturshringi police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलीस दलातील (Pune Rural Police) पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत (Police Recruitment) बनावट प्रमाणपत्र (Fake Certificate) सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दोघांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फसवणुक (Fraud) आणि बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime News) आला आहे.

सुजित शिवाजी साळुंखे Sujit Shivaji Salunkhe (वय-25 रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर), शरद नागनाथ माने Sharad Nagnath Mane (वय-26 रा. वडोली, ता. माढा जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील (PSI Vinayak Dadas-Patil) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजित आणि शरद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

सुजीत साळुंखे, शरद माने पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत (Police constable Recruitment) दोघांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात (SP Office) सादर केले होते. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बीडमधील जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातून (District Rehabilitation Officer Office, Beed) घेतल्याचे दोघांनी भासवले. मात्र पडताळणीमध्ये दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | fake certificate for police recruitment crime against two candidates in chaturshringi police station

Related Posts