IMPIMP

Pune Crime News | बंगला विकत घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रे केली तयार; दुसर्‍याने बंगल्यावर घेतले सव्वा दोन कोटींचे कर्ज, ७५ वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | बंगला विकत घेतो, असे सांगून कागदपत्राच्या झेरॉक्स घेऊन त्यावरुन बनावट कागदपत्रे
(Fake Documents) तयार केली. त्याआधारे बंगला दुसर्‍याला विकला. त्याने त्या बंगल्यावर २ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक
(Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत बिबवेवाडी येथील ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मिलिंद भुसारी (रा. गुरुवार पेठ), राजेश रमेश खंडेलवाल आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नींच्या नावाने बिबवेवाडीतील
सहानी सुजन पार्कमध्ये बंगला आहे. मिलिंद भुसारी याने बंगला विकत घेतो, असे सांगून त्यांच्याकडून
बंगल्याचे कागदपत्रांची झेरॉक्स प्रती घेतल्या. त्यातील सीटीएस नंबरमध्ये फेरफार करुन मालमत्तापत्रक बनावट
बनविले. तसेच फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाने दुसर्‍यांचे फोटो लावून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार केले.
फिर्यादीच्या बंगल्याचा पुणे महानगर पालिकेचा बांधकाम चालू करण्याचा दाखला व बांधकाम पूर्ण झाल्याचा
दाखला याचा वापर केला. फिर्यादी यांचा बंगला राजेश खंडेलवाल यांना विकला. त्यावर खंडेलवाल यांनी २ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचे होम लोन बँकेतून मंजूर करुन फिर्यादी यांची फसवणूक (Cheating Case) केली. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | forged documents in the name of buying a bungalow; Another took a loan of two and a half crores on a bungalow, cheating a 75-year-old senior

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटील यांचे खळबळजनक विधान; म्हणाले…

Pandharpur News | देवाच्या लग्नाला पावणे दोन कोटींचा सोन्याचा आहेर; सोन्याचे दोन मुकुट, सोन्याच्या बांगड्या, सोन्या -चांदीचे रुखवताची भेट

Maharashtra News | महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार; झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण

 

Related Posts