IMPIMP

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बहाण्याने केली लाखो रुपयांची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Fraud of lakhs of rupees on different pretexts by pretending marriage

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख करुन तरुणीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखविले. त्यानंतर चुलत भावाचा अपघात झाला, बहिण हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगून त्याने पैसे घेऊन लुबाडल्याचा (Cheating Case) प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत मंगळवार पेठेतील एका २७ वर्षाच्या तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित प्रकाश भालेराव Abhijit Prakash Bhalerao (वय २८, रा. अशोका मार्ग, नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ मे २०२१ पासून आतापर्यंत घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भालेराव याने फिर्यादी यांच्यासोबत शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख करुन घेतली. त्यानंतर त्यांना लग्नाचे खोटे आमिष दाखविले. त्यांच्या घरी येऊन विश्वास संपादन केला.
त्यानंतर वडिलांचा पगार झाला नाही. चुलत भावाचा अपघात झाला.
बहिण हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगून वेळोवेळी फिर्यादी यांचे वडिल,
आई व बहिणीकडून ६ लाख ६६ हजार ५०० रुपये घेतले. त्यातील ४ लाख रुपये परत केले.
बाकीचे २ लाख ६६ हजार ५०० रुपये परत न करता फिर्यादीची फसवणूक (Fraud Case) केली.
सहायक पोलीस निरीक्षक शेटे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Fraud of lakhs of rupees on different pretexts by pretending marriage

Related Posts