IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – राजन लावंड टोळीच्या 5 जणांविरूध्द ‘मोक्का’, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 22 वी MCOCA कारवाई

by nagesh
Pune Crime News | Commissioner of Police Ritesh Kumar's 15th MPDA action so far against Pune Criminals; Action On Nitesh Sadbhaiya of Vishrantwadi Police Station limits

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | हडपसर पोलिस स्टेशनच्या (Hadapsar Police Station) हद्दीत वेळोवेळी गुन्हे करणार्‍या
राजन लावंड (Rajan Lavand Gang) टोळीतील 5 जणांविरूध्द पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का MCOCA
(Mokka Action) अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ही 22 वी मोक्का कारवाई आहे. राजन लावंड आणि त्याच्या
टोळीतील इतर साथीदारांवर यापुर्वी अपहरण, दुखापत, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत आणि विनयभंग सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Pune
Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजन रघुनाथ लावंड Rajan Raghunath Lavand (21) , ओम उर्फ पिंटु विनोद भंडारी Om Alias Pintu Vinod Bhandari (22), ऋषिकेश उर्फ मेघराज प्रविण शितोळे Rishikesh Alias Meghraj Pravin Shitole (19), रोशन हनुमंत सोनकांबळे Roshan Hanumant Sonkamble (21) आणि सागर शिवाजी घायतडक Sagar Shivaji Ghaytadak (19, सर्व रा. माळवाडी, हडपसर – Malwadi Hadpsar) यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. दि. 29 मार्च 2023 रोजी राजन लावंड आणि त्याच्या साथीदारांनी एकाला जबर मारहाण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. सदरील खुनाच्या गुन्हयात हडपसर पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती. दरम्यान, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांनी टोळीचा म्होरक्या राजन लावंड याला 2 वर्षाकरिता तडीपार केलेले होते. असे असताना देखील त्याने पुन्हा-पुन्हा गुन्हे केल्याचे पोलिसांच्या (Pune Police) तपासात निष्पन्न झालेले आहे. (Pune Crime News)

 

आरोपींविरूध्द दाखल असलेल्या गुन्हयात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे (Sr PI Arvind Gokule) यांनी पोलिस उपायुक्तांमार्फत अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार (IPS Ranjan Kumar Sharma) शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. दरम्यान, पोलिस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) यांनी राजन लावंड टोळीविरूध्द मोक्का कारवाई केलेली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत पुण्यातील गुन्हेगारी टोळयांविरूध्द कडक कारवाई
केली असून आतपर्यंत त्यांनी 22 टोळयांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे.

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे (PI Digamber Shinde), पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे (Vishwas Dagale), सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde), सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डांगे (API Santosh Dange), पोलिस अंमलदार प्रविण शिंदे, गिरीश एकोर्गे, महेश उबाळे, राकेश चव्हाण, महिला पोलिस नाईक खैरे, पोलिस अंमलदार प्रशांत दुधाळ, निखील पवार, शाहिद शेख, अमोल दणके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Hadapsar Police Station – 22nd MCOCA action by Commissioner of Police Ritesh Kumar against criminals in pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – बोपोडीत युवकाच्या खुनाचा प्रयत्न, चौघांविरूध्द गुन्हा

CM Eknath Shinde | आरक्षणाचा मार्ग बंद झालेला नाही, गैरसमज करुन घेऊ नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व दौरे रद्द करुन बोलावली मंत्रिमडंळाची बैठक’

Ajit Pawar | कोण संजय राऊत? उगाच अंगाला का लागावं? अजित पवारांचा टोला

 

Related Posts