IMPIMP

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व दौरे रद्द करुन बोलावली मंत्रिमडंळाची बैठक’

by nagesh
Maratha Reservation | after rejection of maratha reservation review petition chief minister on action mode canceling all tours information from shambhuraj desai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर राज्य सरकारने (State Government) केलेली
पुनर्विचार याचिका (Reconsideration Petition) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षण
(Maratha Reservation) लागू, होण्याची शक्यता मावळी आहे. ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. आर. शहा (Senior Justice M. R. Shah), न्या. संजीव खन्ना
(Justice Sanjiv Khanna), न्या. भूषण गवई (Justice Bhushan Gavai), न्या. रवींद्र भट (Justice Ravindra Bhat) आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम
(Justice V. Ramasubramaniam) यांनी ही याचिका न्यायमूर्तींच्या कक्षात झालेल्या बैठकीत विचार घेऊन फेटाळल्याचे जाहीर केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढची दिशा ठरवण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तातडीने बैठक बोलवली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री (State Excise Minister) शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. तसेच कोणत्याही परिस्थितीत मराठा समजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मंत्रिमंडळाची मराठा आरक्षण उपसमिती (Maratha Reservation Sub-Committee) आहे. या उपसमितीची तातडीची बैठक मुंबईत बोलवण्यात आली आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेवर निकाल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), उदय सामंत (Uday Samant), दादा भुसे (Dada Bhuse), गिरीश महाजन (Girish Mahajan), रवी चव्हाण (Ravi Chavan) आणि मला तातडीने मुंबईला येण्याचे आदेश दिले आहेत. सर्व दौरे रद्द करुन मुंबईत येण्यास सांगितले आहे. दुपारी एकच्या सुमरास बैठक होईल, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

 

कोणत्याही परिस्थितीत हे आरक्षण टिकवायचंच. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, याकरता माजी न्यायमूर्ती भोसले (Former Justice Bhosale) आणि माजी न्यायमूर्ती गायकवाड (Former Justice Gaikwad) यांच्यासह बाकीच्या लोकाशी चर्चा करण्याची जबाबदारी आम्हा मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. ताबडतोब फेरविचार याचिका करायची का की काही याबाबत या बैठकीत ठरवले
जाणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maratha Reservation | after rejection of maratha reservation review petition chief minister on action mode canceling all tours information from shambhuraj desai

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | कोण संजय राऊत? उगाच अंगाला का लागावं? अजित पवारांचा टोला

Pune Crime news | पुणे क्राईम न्युज : शिवाजीनगर पोलीस स्टेशन – जंबो कोविड सेंटर – पीएमआरडीए | ‘या’ कारणासाठी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यासह डॉ. हेमंत गुप्ता, संजय शहा आणि राजू साळुंखेविरूध्द फसवणूकीचा गुन्हा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

Pune Crime News | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरला जामीन मंजूर

 

Related Posts