IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लष्कर पोलिस स्टेशन – बँकेच्या कॅशियरच्या नावाने बँकेत केली फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Lashkar Police Station – Bank fraud committed in the name of bank cashier

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बँकेतून मोठी रक्कम काढलेल्या एका कर्मचार्‍याला चोरट्यांनी बँकेच्या कॅश काऊंटरजवळच (Bank Cash Counter) कॅशियरच्या नावाने गंडा (Cheating Case) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एका उंड्री (Undri) येथील ५३ वर्षाच्या कर्मचार्‍याने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२६/२३) दिली आहे. हा प्रकार जनरल थिमया रोडवरील इंडसइंड बँकेत (IndusInd Bank Camp Branch) मंगळवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ढोले पाटील रोडवरील (Dhole Patil Road Pune) कंपनीत कामाला आहे. कंपनीतील व्यवस्थापकाने त्यांना बँकेतून ३ लाख रुपये काढून आणण्यासाठी धनादेश (Check) दिला होता. पैसे काढून आणण्यासाठी ते कॅम्पमधील जनरल थिमया रोडवरील इंडसइंड बँकेत गेले. त्यांनी बँकेत धनादेश जमा करुन ३ लाख रुपये काढले.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

रोकड बॅगेत ठेवत असताना कॅश काऊंटरजवळ उभा असलेल्याने माणसाने
त्यांना पेन्सिलने खुणा केलेल्या व हळद लागलेले बंडल कॅशिअरने परत मागितले आहे,
असे सांगितले. त्यांना तो बँकेचा माणूस वाटल्याने त्यांनी त्यातील एक बंडल त्याच्याकडे दिले.
हे घेऊन तो नजर चुकवून पसार झाला. काही वेळाने त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. पोलीस उपनिरीक्ष कांबळे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Lashkar Police Station – Bank fraud committed in the name of bank cashier

Related Posts