IMPIMP

ACB Trap On Talathi News | 50 हजाराची लाच घेताना सराईत लाचखोर तलाठ्यास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

by nagesh
ACB Trap On Talathi News | Anti Corruption Bureau Arrest Talathi Balasaheb Shankar Jagtap In Bribe Case Of 50000 Sangli

सांगली : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap On Talathi News | बेकायदा वाळुची साठवणुक (Stock Of Illegal Sand) केली म्हणुन कारवाई न करण्यासाठी 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 50 हजाराची लाच (Sangli Bribe Case) घेणार्‍या तलाठ्यास अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (Sangli ACB Trap). त्याला अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान, याच तलाठ्यास दि. 7 जुलै 2014 रोजी 10 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. (ACB Trap On Talathi News)

बाळासाहेब शंकर जगताप Balasaheb Shankar Jagtap (57, तलाठी करजगी, ता. जत, जि. सांगली. राहणार – मु.पो. आसंगी, गुड्डापूर रोड, ता. जत, जि. सांगली) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यांनी त्याकरिता वाळू आणली आहे. ती वाळू ही बेकायदेशीरपणे साठविली आहे. असे सांगुन बेकायदा वाळुची साठवणुक केली म्हणून कारवाई न करण्याकरिता बाळासाहेब जगताप यांनी तक्रारदाराकडे दि. 12 जून 2023 रोजी 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. (ACB Trap On Talathi News)

प्राप्त तक्रारीची दि. 13 जून 2023 रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तलाठी बाळासाहेब जगताप हे 50 हजाराची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पोलिसांनी जगतापच्या घरासमोर सापळा रचला. त्यावेळी जगतापने सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 50 हजार रूपये लाच म्हणुन घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

तलाळी बाळासाहेब जगताप यांना दि. 7 जुलै 2014 रोजी 10 हजार रूपयाची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यावेळी मिरज शहर पोलिस स्टेशनमध्ये (Miraj City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हया सध्या न्यायप्रविष्ठ आहे. (Sangli Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक विजय चौधरी (Addl SP Vijay Chaudhary)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक संदीप पाटील (DySP Sandeep Patil), पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी (PI Dattatray Pujari),
पोलिस निरीक्षक विनायक भिलारे (PI Vinayak Bhilare), पोलिस अंमलदार प्रितम चौगुले, ऋषीकेश बडणीकर,
अजित पाटील, सलिम मकानदार, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, पोपट पाटील, सीमा माने,
उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : ACB Trap On Talathi News | Anti Corruption Bureau Arrest Talathi Balasaheb Shankar Jagtap
In Bribe Case Of 50000 Sangli

Related Posts