IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – महिलेने दिली बॉम्बने कॅब उडवून देण्याची धमकी

by nagesh
Pune Crime News | Chandan Nagar Police Arrest Farhin Alruman Shaikh In Cab Bomb Threat Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पतीने दुसरे लग्न (Second Marriage) केल्याने त्याच्या कंपनीच्या कॅब बॉम्बने उडविण्याची धमकी (Cab Bomb Threat) देणारा ईमेल महिलेने पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Pune Police News) फरहीन अलरुमान शेख Farhin Alruman Shaikh (वय ३३, रा. कोंढवा – Kondhwa) या महिलेला अटक केली आहे.

याबाबत खराडी येथील ऑल स्टेट कंपनीच्या (Allstate Company) व्यवस्थापकाने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६३/२३) दिली आहे. हा प्रकार कंपनीत ११ जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबतची माहिती अशी, ऑल स्टेट कंपनीमध्ये अलरुमान शेख (वय ३२) हे कामाला आहेत.
त्याने दुसर्‍या महिलेबरोबर लग्न केले. त्यातून फरहीन शेख हिच्याबरोबर घरामध्ये नेहमी वाद होत होते.
अलरुमान याची नोकरी जाण्याच्या ईराद्याने तिने पतीचा मेल आय डी वापरुन फिर्यादीचे कंपनीचे मेलवर मेल पाठविला. त्यात कंपनीचे कॅब बॉम्बने उडविण्याची धमकी दिली होती. तसेच कंपनीचे ऑफिस व कॅब्ज उडविण्याची धमकी दिली. त्यातून सर्वांची एकच धावपळ उडाली होती. हा मेल या महिलेने केल्याचे उघड झाल्यावर तिला अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Sr PI Ragendra Landage) तपास करीत आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Web Title : Pune Crime News | Chandan Nagar Police Arrest Farhin Alruman Shaikh In Cab Bomb Threat Case

Related Posts