IMPIMP

Pune Crime News | एरंडवण्यातील अभिषेक जाधव टोळीतील 7 जणांवर ‘मोक्का’, पोलिस आयुक्तांची 20 वी MCOCA कारवाई

by nagesh
Pune Crime News | MCOCA action against 7 members of Abhishek Jadhav gang in Erandwane Kothrud

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | एरंडवणे परिसरातील अभिषेक जाधव आणि त्याच्या साथीदारांविरूध्द पोलिस आयुक्त रितेश
कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. जाधव आणि त्याच्या साथीदाराने कोथरूड परिसरातील हॅप्पी कॉलनीत नंदु अनंता जाधव (22) याचा
फेब्रुवारी 2023 मध्ये खून केला होता. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अभिषेक रोहिदास जाधव (23, रा. गणेशनगर, ओटा वसाहत, एरंडवणे), तन्मय तानाजी इटकर (19, रा. धारवडकर बिल्डींग, नर्‍हे रोड), ईश्वर खंडूलाल चव्हाण (18, रा. लक्ष्मीनगर वसाहत, डहाणूकर कॉलनी, कोथरूड), सुजल संजय कदम (18, रा. गोसावी वस्ती, नवीन शिवणे, कर्वेनगर, कोथरूड), पियुष सतीश जाधव (20, रा. कांबळे चाळ, आंबेडकर चौक, वारजे) आणि त्यांच्या 2 अल्पवयीन साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी आपआपसात संगणमत करून संघटित टोळी तयार केली. त्यांनी दि. 23 फेबु्रवारी 2023 मध्ये नंदु जाधव याचा धारदार हत्याराने वार करून खून केला होता. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात सुरूवातीला खुनाच्या प्रयत्नाचा आणि नंतर खुनाचा गुन्हा दाखल आहे. (Pune Crime News)

 

आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपी हे स्वतःची संघटित टोळी तयार करून अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने गुन्हेगारी कृत्य करीत असल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्या मार्फतीने अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. प्रकरणाची छाननी करून आरोपींविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आतापर्यंत 20 टोळयांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता पाटील, उपनिरीक्षक सपताळे आणि इतर पोलिस कर्मचार्‍यांनी ही उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :-  Pune Crime News | MCOCA action against 7 members of Abhishek Jadhav gang in Erandwane Kothrud

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कचरा संकलन वाहनांचे लोकार्पण

Uday Samant | चालकाचे नियंत्रण सुटलं अन्…, उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बोटीला अपघात

Rahul Gandhi | राहुल गांधींना सूरत कोर्टाकडून जामीन मंजूर, खासरदारकी पुन्हा मिळणार?

 

Related Posts