IMPIMP

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कचरा संकलन वाहनांचे लोकार्पण

by nagesh
Chandrakant Patil | Garbage collection vehicles inaugurated by Guardian Minister Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Chandrakant Patil | पुणे महानगरपालिकेतर्फे Pune Municipal Corporation (PMC) कचरा संकलन
करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. ही
वाहने शहर स्वच्छता आणि पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त आशा राऊत, महेश डोईफोडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, कार्यकारी अभियंता गणेश उगले, कनिष्ठ अभियंता आशिष कोळगे आदी उपस्थित होते. (Chandrakant Patil)

 

पालकमंत्री श्री.पाटील यांनी शहरातील कचरा संकलनाविषयी माहिती घेतली. ओला आणि सुका कचरा वेगळा संकलीत करून सर्व कचऱ्यावर प्रक्रीया होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी या नव्या वाहनांचा उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

महापालिकेतर्फे ओला व सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहनांचा उपयोग करण्यात येत असून १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रीया करण्यात येत आहे. कचरा संकलन प्रक्रीयेसाठी १०८ लहान वाहने, ९३ ओला कचरा संकलक वाहने आणि सुक्या कचऱ्यासाठी ५६ कॉम्पॅक्टर अशी एकूण २५७ वाहने भाडेतत्वावर घेण्यात येत आहे. त्यापैकी ८० वाहनांचे लोकार्पण करण्यात आले असून उर्वरीत महिन्याभरात महापालिकेच्या सेवेत दाखल होतील. महापालिकेची ५१८ वाहने पूर्वीपासून कार्यरत असून नवी वाहने आल्यानंतर शहरातील कचरा पूर्ण क्षमतेने एकत्रित करण्यात येईल. शहरात २५ ठिकाणी या कचऱ्यावर प्रक्रीया करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

शहरात दैनंदिन सुमारे २ हजार १०० मे.टन घनकचरा निर्माण होतो. निर्माण झालेला कचरा महापालिकेमार्फत संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. त्यासाठी ही नवी वाहने भाडेतत्वावर घेण्यात आली आहेत. या सर्व वाहनांवर जीपीएस आणि आरएफआयडी उपकरणे बसविण्यात आली असून वाहनांच्या कामांची नोंद महानगरपालिकेतील नियंत्रण कक्षाद्वारे घेण्यात येणार आहे. या वाहनांवर ७ वर्षासाठी सुमारे ३२५ कोटी खर्च होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सर्व वाहने बीएस-६ प्रदूषण मानांकनाची असून त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. रिफ्यूज कलेक्टर (ओल्या कचऱ्यासाठीचे वाहन) वाहनाचे कचरा एकत्रित केल्यानंतरचे वजन १४ मे.टन असून कचरा वाहून नेण्यासाठी वाहनावर ७ क्यु.मीटरचा कंटेनर आहे. वाहनावरील हायड्रोलिक यंत्रणेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होण्यास मदत होणार आहे.

 

लहान वाहनांचे कचरा संकलनानंतरचे वजन २.५ मे.टन तर कॉम्पॅक्टर वाहनाचे १८.५ मे.टन आहे. कॉम्पॅक्टर वाहनावर १४ क्यू.मीटर क्षमतेचा कंटेनर बसविण्यात आला आहे. या वाहनात लहान घंटागाड्यांमधून कचरा संकलीत करण्यात येईल. ही वाहने संपूर्ण बंदिस्त स्वरुपात कचरा वाहतूक करणार आहेत.

 

 

पालकमंत्र्यांची शहरातील विकासकामांना भेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेतर्फे जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या डॉ. नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कामास भेट देऊन पाहणी केली.

 

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सांडपाणी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे आदी उपस्थित होते.

 

प्रकल्पाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे व सांडपाणी शुद्धीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करावा.
प्रक्रीया केलेल्या पाण्याच्या पुनरुपयोगाबाबत आतापासून नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.

 

या प्रकल्पाची क्षमता १२७ द.ल. लिटर प्रतिदिन असून प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला ४ कोटी रुपयांची वीज निर्माण होणार आहे.
ही वीज महापालिका उपयोगात आणणार असल्याने वीज खर्चात बचत होणार आहे.
शहरात विविध ठिकाणी असे प्रकल्प उभारण्यात येत असून २०२५ अखेरपर्यंत नदीत प्रक्रीया केलेले पाणीच सोडण्यात येईल.
प्रकल्पातून तयार होणाऱ्या पाण्याचा उद्योगासाठीदेखील वापर करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामास भेट

पालकमंत्री श्री.पाटील यांनी बंडगार्डन येथील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाचीदेखील यावेळी पाहणी केली. नदीच्या दोन्ही बाजूस स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात यावी.
नदी किनाऱ्यावर नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याचा आनंद मिळेल अशा पद्धतीने कामे करण्यात यावी,
असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम एकूण ११ भागात विभागण्यात आले असून त्यापैकी
संगमवाडी ते बंडगार्डन पूल आणि बंडगार्डन पूल ते मुंढवा या कामासाठी मार्च २०२२ मध्ये आदेश देण्यात आले असून
ही कामे सुरू करण्यात आली आहेत.
कामाचा प्रथमत: ३०० मीटरचा भाग पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

 

Web Title :-   Chandrakant Patil | Garbage collection vehicles inaugurated by Guardian Minister Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Uday Samant | चालकाचे नियंत्रण सुटलं अन्…, उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बोटीला अपघात

Rahul Gandhi | राहुल गांधींना सूरत कोर्टाकडून जामीन मंजूर, खासरदारकी पुन्हा मिळणार?

Devendra Fadnavis | ‘फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा’, भाजपच्या माजी मंत्र्याचं भरसभेत अजब विधान

 

Related Posts