IMPIMP

Pune Crime News | घरातील कुक कडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना

by sachinsitapure
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | घरत कुक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग (Molestation) केला आहे. याप्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत उंड्री येथे घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली. यावरून रणजित कुमार दिनेश मंडल (रा. कडनगर, उंड्री) याच्यावर आयपीसी 354, 506, सह पोक्सो कलम 8, 10, 12 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंडल फिर्यादी यांच्या घरात कुक (Cook) म्हणून काम करतो. आरोपीने फिर्यादी यांच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. तसेच बाबांना सांगितले तर तुला बघुन घेईन अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत आईला सांगितले. पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील (API Dinesh Kumar Patil) करीत आहेत.

Related Posts