IMPIMP

Pune Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | नागरिकांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) करण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत आहेत. पुणे शहरामध्ये सायबर क्राईमच्या (Cyber Crime) फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वेगवेगळे टास्क पूर्ण करायला लावून फसवणूक केली जात आहे. यूट्यूब चॅनल सबस्क्राइब (Subscribe YouTube Channel) करण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक केल्याची घटना उंड्री परिसरात घडली आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत उंड्री परिसरात राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) रविवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी टेलिग्राम आयडी धारक, 8452379792, 7977164253 मोबाईल धारक यांच्यावर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट (IT Act) 66 सी नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2023 या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मोबाईल धारकाने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला.
त्यांना पार्ट टाईम जॉब (Part Time Job) असल्याचे सांगून युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करुन त्याद्वारे चांगला परतावा
मिळेल असे आमिष दाखवले. महिलेने पार्ट टाईम जॉबसाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यावर त्यांना टेलीग्राम ग्रुपमध्ये (Telegram Group)
अॅड करुन घेतले. त्यानंतर वेळोवेळी टास्क देऊन ते पुर्ण करण्यास लावून सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन सायबर गुन्हेगारांनी महिलेचा विश्वास संपादन केला.

आरोपींनी फिर्यादी यांना आणखी परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.
फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून 5 लाख 49 हजार 600 रुपये आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केले.
पैसे जमा केल्यानंतर फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारचा टास्क न देता आर्थिक फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station)
धाव घेत तक्रार दिली. सायबर पोलिसांकडून हा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

Related Posts