IMPIMP

Pune News | पुणे मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलं हँडग्रेनेड, पाषाण परिसरातील प्रकार

by sachinsitapure
Hand Grenade

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | पुणे शहरामध्ये मट्रोच्या (Pune Metro) कामासाठी खोदकाम करत असताना हँडग्रेनेड (Hand Grenade) सापडल्याने खळबळ उडाली आहे. पाषाण रस्त्यावरील आयशर या संस्थेजवळ मेट्रोचे पत्रे लावण्यासाठी सुरू असलेल्या खोदाई दरम्यान एक हॅन्डग्रेनेड आढळून आले. हे जमीनीमध्ये आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Pune News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे (Chaturshringi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Senior PI Balaji Pandhare) यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बॉम्बशोधक व नाशक पथकाला (Bomb Squad) प्राचारण केले. (Pune News) बॉम्बशोधक व नाशक पथकाने हा हॅन्डग्रेनेड ताब्यात घेतला. तो जागेवरच निकामी करण्यात आला. तसेच या दरम्यान या परिसरातील वाहतूक काहीवेळ थांबवण्यात आली होती. हा हॅन्डग्रेनेड ब्रिटिशकालीन असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी पत्रे लावण्याचे काम सुरु होते.
त्यासाठी खोदकाम करण्यात येत होते.
या दरम्यान हँडग्रेनेड आढळून आले. पुणे मेट्रोकडून पोलिसांना
याबाबत माहिती कळविण्यात आली होती.
बॉम्ब शोधक व नाशक पथकाने हा ग्रेनेड निकामी केला आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Posts