IMPIMP

Pune Crime News | नो पार्किंगमधील चारचाकी काढण्यास सांगितल्याने क्रेन कर्मचार्‍यांना मारहाण करुन वाहतूक महिला शिपायांशी गैरवर्तन; दोघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Misbehavior with women traffic constables by beating up crane operators for asking them to remove four-wheelers from No Parking

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | नो पार्किंगमध्ये (No Parking) लावलेली चार चाकी काढून घेण्यास सांगितल्याने वाहतूक शाखेच्या (pune Police Traffic Branch) क्रेनवरील दोघा कर्मचार्‍यांना मारहाण (Beating) करुन महिला पोलीस कर्मचार्‍यांशी गैरवर्तन करणार्‍या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) अटक केली. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नागेश बबन लोंढे Nagesh Baban Londhe (वय २९, रा. धानोरी -लोहगाव रस्ता – Dhanori-Lohgaon Road), अमोल मालोजी ढोंगे Amol Maloji Dhonge (वय २९, रा. उपळा ढोंगे ता. बार्शी, जि. सोलापूर – Barshi Solapur) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिसरा साथीदार पळून गेला. याबाबत विश्रामबाग वाहतूक शाखेतील महिला कर्मचार्‍यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५९/२३) दिली आहे. हा प्रकार शनिवारवाडा येथील फुटका बुरुज येथे सोमवारी रात्री पावणे आठ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वाहतूक शाखेतील क्रेनवर ड्युटीला होत्या. त्यांच्या समवेत क्रेनवर गणेश परकाळे
व लखन शेडगे हे दोघे होते. त्या शनिवारवाडा येथील फुटका बुरुज येथे आल्या असताना एक चार चाकी नो पार्किंगमध्ये होती.
त्यांनी ती काढण्यास सांगितले. तेव्हा कारचालकाने यांच्या क्रेनला गाडी आडवी लावून सीपी आमच्या घरातील असून तुझी नोकरी घालवतो,
असे म्हणत अश्लिल शिवीगाळ केली. त्यांच्या मदतीला आलेल्या गणेश परकाळे यांना हाताने मारहाण केली.
एक मोठा दगड मारण्यासाठी त्यांच्यातील एक जण घेऊन आला.
गणेश परकाळे याला हाताने धरुन शनिवारवाड्याच्या पाठीमागील भिंतीवर डोके आपटले व डोळ्यावर मारहाण केली.
त्यानंतर मदतीला आलेल्या पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांचा तिसरा साथीदार पळून गेला.
पोलीस उपनिरीक्षक साळुंखे (PSI Salunkhe) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Misbehavior with women traffic constables by beating up crane operators for asking them to remove four-wheelers from No Parking

Related Posts