IMPIMP

Pune Crime News | मुंढवा : भांडणे सोडविण्यास जाणे पडले महागात; तरुणाला मारहाण करुन केले जबर जखमी

by nagesh
Pune Crime News | Mundhwa: It is expensive to settle disputes; The young man was beaten and seriously injured

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मित्राला मारहाण (Beating) करीत असताना त्याला सोडविण्यास केलेल्या तरुणाला तिघांनी
बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. (Pune Crime News)

 

याप्रकरणी विशाल विठ्ठल नागटिळक (Vishal Vitthal Nagtilak) (वय ३२, रा. लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात
(Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सार्थक संतोष हिंमगिरे Sarthak Santosh Himgire
(वय १९) आणि ऋषिकेश गायकवाड Rishikesh Gaikwad (वय २१) यांना अटक (Arrest) केली असून त्यांचा साथीदार अनुप अमर ढगे (वय २४)
याचा शोध घेतला जात आहे. ही घटना लोणकर वस्तीत ३ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र तेजस हे लोणकर चौकाकडून ऑरबिस स्कुलकडे जात होते. त्यावरुन त्यांच्या तोंडओळखीचे आरोपी मोटारसायकलवरुन आले. त्यांनी तेजस याला “काय रे तु रस्त्याच्या कडेला का थांबला आहे. तुला लई मस्ती आली आहे का” असे म्हणून त्याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असताना आरोपींनी त्यांना “तुझा काय संबंधमध्ये पडायचा थांब तुला पण दाखवतो,” असे म्हणून अनुप ढगे याने धारदार हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात, हातावर, पायावर मारुन गंभीर जखमी केले. या प्रकारानंतर फिर्यादी यांना भिती वाटत असल्याने त्यांनी तक्रार दिली नव्हती.
बुधवारी त्यांनी तक्रार दिल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Mundhwa: It is expensive to settle disputes; The young man was beaten and seriously injured

 

हे देखील वाचा :

Pune ACB Trap | सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील PSI ने गाठला भ्रष्टाचाराचा ‘कळस’; 50 हजार रूपयाच्या लाचप्रकरणी उपनिरीक्षक शशिकांत पवारला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | खळबळजनक! महिलेसह 2 मुलांचा खून करुन मृतदेह टाकले जाळून; कोंढव्यातील घटना

Aaditya Thackeray | जाहिर सभेत आदित्य ठाकरेंचं भाकीत, म्हणाले- ‘हे सरकार काही तासांचे’

Devendra Fadnavis | जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Related Posts