IMPIMP

Pune ACB Trap | सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील PSI ने गाठला भ्रष्टाचाराचा ‘कळस’; 50 हजार रूपयाच्या लाचप्रकरणी उपनिरीक्षक शशिकांत पवारला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune ACB Trap | Sinhagad Road Police Station PSI Reaches 'Clip' of Corruption; Sub-Inspector Shashikant Pawar arrested by anti-corruption in bribery case of 50 thousand rupees, know the case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune ACB Trap | बदली चालकाने परस्पर कर्नाटकात नेलेली कार परत मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची
लाच (Bribe) मागणार्‍या सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) गुन्हा दाखल
केला आहे. तडजोडीअंती 20 हजार रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी उपनिरीक्षक शशिकांत नारायण पवार (PSI Shashikant Narayan Pawar)
यांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक करण्यात आली आहे. चक्क बदली ड्रायव्हरने कर्नाटकमध्ये नेलेली कार परत मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचा
मोबदला म्हणून लाच मागुन पवार यांनी भ्रष्टाचाराचा ‘कळस’च गाठला (Pune Bribe Case) असेच म्हणाले लागेल. पीएसआयला लाचप्रकरणी अटक
झाल्याने पुणे शहर पोलिस दलात (Pune City Police) प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शशिकांत नारायण पवार (PSI Shashikant Pawar Arrested) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सध्या ते सिंहगड पोलीस ठाण्याअंतर्गत (Sinhagad Road Police Station) अभिरुची पोलीस चौकीमध्ये (Abhiruchi Police Station) कार्यरत आहेत. (Pune ACB Trap)

 

तक्रारदार यांच्या मालकीची मारुती इर्टिंगा कार त्यांचा बदली चालक परस्पर घेऊन कर्नाटकात गेला होता. हे वाहन परत मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी शशिकांत पवार याच्याकडे आली होती. ती कार परत मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून पवार याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. २५ जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली. तेव्हा तडजोडीत २० हजार रुपये घेण्याची तयारी पवार याने दर्शविली. लाचेची मागणी करण्यात आली असल्याने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 हजार रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी उपनिरीक्षक शशिकांत नारायण पवार यांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार (PSI Vijayamala Pawar) तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Pune ACB Trap | Sinhagad Road Police Station PSI Reaches ‘Clip’ of Corruption; Sub-Inspector Shashikant Pawar arrested by anti-corruption in bribery case of 50 thousand rupees, know the case

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | खळबळजनक! महिलेसह 2 मुलांचा खून करुन मृतदेह टाकले जाळून; कोंढव्यातील घटना

Aaditya Thackeray | जाहिर सभेत आदित्य ठाकरेंचं भाकीत, म्हणाले- ‘हे सरकार काही तासांचे’

Devendra Fadnavis | जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Narayan Rane | ‘2019 ला फडणवीसांना सांगितलं होतं की युती करु नका, पण…’, नारायण राणेंचा खुलासा

 

Related Posts