IMPIMP

Aaditya Thackeray | जाहिर सभेत आदित्य ठाकरेंचं भाकीत, म्हणाले- ‘हे सरकार काही तासांचे’

by nagesh
Aaditya Thackeray | shivsena aditya thackeray on eknath shinde in thane sabha on roshani shinde case

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी (Roshni Shinde Beating Case) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi)
ठाण्यात महामोर्चा काढला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. याच्यावर एफआयआर
(FIR) टाका, त्याच्यावर गुन्हे दाखल करा. आज सांगतोय, हे सरकार काही तासांचं आहे. पोलीस अधिकाऱ्यांना (Thane Police) सांगतोय, सरकार
आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आहे. मग जेलभरो आंदोलन करणार आहे. जेलभरो आंदोलनामध्ये तुम्हाला आणि गद्दारांना जेलमध्ये
भरल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका दिवसात ठाण्याला बदनाम केलं

आज ठाण्यात अतिशय गलिच्छ राजकारण केलं जात असून ज्या महिलेला मारहाण करण्यात आली, त्याच महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी एक दिवसात सुसंस्कृत ठाण्याला बदनाम केलं. मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार असं जाहीर आव्हान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिले.

 

 

स्वार्थासाठी आज राज्य अंधारात गेलं

एका व्यक्तीच्या स्वर्थासाठी हे राज्य आज अंधारात गेलं असल्याचं सांगत गद्दारांना आम्ही त्यांची जागा दाखवणारच. एक गद्दार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना जाहीर शिव्या देतोय, त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवलं जातंय. दुसरा एका गद्दाराने सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना शिव्या दिल्या, त्याला मांडीला मांडी लावून बसवलं जातंय. आज रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. मात्र, पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला, हे दुर्दैवी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

एकनाथ शिंदेंची केली नक्कल

कुणाबद्दल काही बोलू नये, कुणावर टीका करु नये, महिलांवर हात उचलला जात आहे, शिवीगाळ केली जात आहे. पण तरीही मर्दांगी दाखवायची आहे. इकडे शर्ट खाली खेचत, वरती खाली बघत, दाढी खाजवत असं काही करत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नक्कल केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर पोलीस आयुक्त पळून गेले

आपल्याला आज 17 अटी आलेल्या आहेत. मोर्चा काढायचा असेल तर अमूकच बोलू शकतात. टका, आमच्या सगळ्यांवर केसेस टाका पुन्हा होऊन जाऊदे. पोलीस आयुक्तांच्या ऑफिससाठी आम्ही एक टाळं आणलेलं आहे. कारण काल जेव्हा मिधेंच्या गद्दार गँगच्या लोकांनी, टोळींनी जेव्हा रोशनी शिंदेंवर हल्ला केला, तेव्हा तक्रार घ्यायला तयार नव्हतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चिडून पोलीस आयुक्तालयात गेले तर पोलीस आयुक्त पळून गेले होते. आज रोशनी शिंदे या रुग्णालयात आहेत, पण त्यांच्या रुमच्या बाहेर पोलीस बसवण्यात आले आहेत. त्या बऱ्या झाल्या, त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेच त्यांना अटक केली जाईल. हे असं सुरु आहे राज्यात, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

 

 

Web Title :- Aaditya Thackeray | shivsena aditya thackeray on eknath shinde in thane sabha on roshani shinde case

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Supreme Court | ED, CBI विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, काँग्रेस-शिवसेनेसह 14 विरोधी पक्षांना कोर्टाचा दणका

Narayan Rane | ‘2019 ला फडणवीसांना सांगितलं होतं की युती करु नका, पण…’, नारायण राणेंचा खुलासा

Narayan Rane | ‘तू मुख्यमंत्री होतास ना? तेव्हा मुळापासून गुंडगिरी का उखडून टाकली नाही?’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर ‘प्रहार’

 

Related Posts