IMPIMP

Pune Crime News | खून, खूनाचा प्रयत्न, फसवणूक, महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ; पुण्यात 2022 मध्ये गुन्हेगार मोकाट, वाहनचोरी रोखण्यात अपयश

by nagesh
Pune Crime News | Murder, attempted murder, fraud, violence against women; In Pune in 2022 criminals go free, failure to prevent vehicle theft

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | २०२२ मध्ये पोलिसांनी संघटित गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई (मोक्का) MCOCA केली असली तरी शहरातील गुन्हेगारी (Crime In Pune) कमी होण्यास त्यामुळे फारशी मदत झाल्याचे दिसून येत नाही. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खून (Murder), खूनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी (Robbery), दुखापत, महिलांवरील अत्याचारांच्या (Crime Against Woman) घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोनसाखळी चोरीचे गुन्हे कमी झाले असले तरी आता मोबाईलवर रस्त्याने बोलत जाणार्‍या नागरिकांच्या हातातून मोबाईल हिसकावून नेण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये २०२२ मध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महिलांना क्रूर वागणूक देणे, विनयभंग (Molestation Case), बलात्कार (Rape In Pune) अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. २०२१ च्या तुलनेत महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात २०२२मध्ये २०० हून अधिक गुन्हे वाढले आहेत.

 

वाहनचोरी रोखण्यात अपयश

पुणे शहरातून वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अगदी पे अँड पार्कमध्ये ठेवलेली वाहनेही चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. २०२२ मध्ये तब्बल १९१० वाहने चोरीला गेली. ही संख्या २०२१ मध्ये १५०२ इतकी होती. हे पाहता एकाच वर्षात वाहनचोरीच्या गुन्ह्यात चारशेने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (Pune Crime News)

अडीच हजार गुन्हे वाढले

गेल्या दोन वर्षाची तुलना केली असता भाग १ ते ५ मधील महत्वाच्या गुन्ह्यात तब्बल अडीच हजारांनी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ८ हजार ६४ गुन्हे दाखल झाले होते़ ते २०२२ मध्ये १० हजार ५६७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचवेळी जुगार, दारुबंदी वरील कारवाईत मात्र घट झाली आहे.

 

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान शहरात दाखल गुन्हे

गुन्हा २०२२ २०२१
खून ९४ ८४
खुनाचा प्रयत्न ३२८ २९०
सोनसाखळी चोरी ६७ ८१
मोबाइल चोरी १३२ ९४
जबरी चोरी २१८ १७५
घरफोडी ६१२ ४३५
दुखापत १०८४ ९२१
विवाहितेचा छळ ४८० ३२७
बलात्कार ३०५ २२९
विनयभंग ५७८ ३८५
फसवणूक ९८२ ७१५
चोरी १३३८ ८४१
वाहनचोरी १९१० १५०२
प्राणघातक अपघात ३०७ २२४

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Murder, attempted murder, fraud, violence against women; In Pune in 2022 criminals go free, failure to prevent vehicle theft

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | दीपक केसरकरांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचे प्रतिउत्तर, म्हणाले…

Winter Health | हिवाळ्यात लवंग आणि काळी मिरी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक, सेवन केल्याने होईल ‘इम्यून सिस्टम’ मजबूत!

Hair Fall | ‘हेयर फॉल’च्या समस्येने असाल त्रस्त, तर असा करा कांद्याचा वापर, जाणून घ्या याचे ३ फायदे!

 

Related Posts