IMPIMP

Pune Crime News | उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीकडून सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण

भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार; 3 जणांवर FIR

by sachinsitapure
Bhosari Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | विनापरवानगी गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याच्या रागातून भाजपच्या महिला नगरसेविकेच्या (BJP Corporator) पतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला (Assistant Health Officer) माराहण केली. ही घटना भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात (‘E’ Regional Office) मंगळवारी (दि.5) दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात (PCPC Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश नंदलाल भाट Rajesh Nandlal Bhat (वय-54 रा. संत ज्ञानेश्वर हौसिंग सोसायटी, थेरगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शंकर मुरलीधर सोनावणे (वय-32 रा. बोपखेल गावठाण, पुणे), संतोष लांडगे Santosh Landge (वय-45) व लाल रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती अंदाजे वय 32 यांच्यावर आयपीसी 353, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. संतोष लांडगे हे भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे (Sarika Landge) यांचे पती आहेत. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी भाट हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य अधिकारी पदावर काम करतात. त्यांनी शंकर सोनवणे याला विनापरवानगी गैरहजर राहणे आणि उद्धट वर्तनाबाबत नोटीस बजावली होती. या कारणावरुन त्याने इतर साथीदारांना घेऊन येत भाट यांना शिवीगाळ केली. त्यांना मारहाण (Beating) करण्यासाठी अंगावर धावून गेला. तर अनोळखी व्यक्तीने भाट यांच्या कानशिलात लगावली.

आरोपींनी फिर्यादी भाट यांना मारहाण करत त्यांच्या कार्यालयात ओढून नले.
शंकर सोनवणे याने तुझ्या नावाने आत्महत्या (Suicide) करुन तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिली.
फिर्यादी शासकीय काम करत असताना आरोपींनी त्यांना अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवारी (PSI Bhawari) करीत आहेत.

Related Posts