IMPIMP

Pune Crime News | तारण ठेवलेले सोने सोडवण्याच्या बहाण्याने फायनान्स कंपनीची फसवणूक, वाघोली येथील प्रकार

by sachinsitapure
Cheating Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | ज्वेलर्स दुकानात गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने (Pledged Gold Jewellery) सोडवण्याच्या बहाण्याने फायनान्स कंपनीची 3 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.2) दुपारी दोनच्या सुमारास डी.बी.ज्वेलर्स वाघोली (D. B. Jewelers Wagholi) येथे घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत अतुल रविंद्र सुर्यवंशी Atul Ravindra Suryavanshi (वय-35 रा. जेएसपीएम कॉलेज (JSPM College) जवळ, ससाणेनगर, हडपसर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन हर्षल पाटील व एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या फायनान्स मध्ये सोने तारण ठेवायचे असल्याचे सांगून
त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर वाघोली येथील डी.बी. ज्वेलर्स या दुकानात ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवायचे आहेत.
असे सांगून आरोपींनी फिर्य़ादी यांच्याकडून 2 लाख 90 रुपये घेऊन पळून गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर
अतुल सुर्यवंशी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts